Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पैसे घे अन् चल निघ.. मनसे नेत्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत राडा; मराठी इन्फ्लूएन्सरला भररस्त्यावर शिवीगाळ, VIDEO व्हायरल

पैसे घे अन् चल निघ.. मनसे नेत्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत राडा; मराठी इन्फ्लूएन्सरला भररस्त्यावर शिवीगाळ, VIDEO व्हायरल
 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री राखी सावंतच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या राजश्री मोरे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख आणि राजश्री यांच्यात वाद होताना दिसत आहे. रविवारी रात्री राजश्रीच्या वाहनाचा अपघात घडला. राहिल शेख दारू पिऊन कार चालवत होता आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप राजश्रीने केला. या घटनेनंतर तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये राहिल राजश्रीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसून येत आहे. तसेच धमकी देत आहे. नंतर तो माफीही मागतो. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
ही घटना रविवारी रात्री मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. राजश्री आपली कार घेऊन जात होती. या दरम्यान, तिच्या कारचा अपघात झाला. राहिल शेख मद्यधूंद अवस्थेत कार चालवत होता आणि यामुळे कारचा अपघात झाल्याचा आरोप राजश्रीने केला. यानंतर राहिलने राजश्रीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. राजश्रीने तातडीने व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. तसेच 'XXXपैसे घे आणि निघ. हवंतर पोलिसांना सांग; मी जावेद शेख यांचा मुलगा आहे. मग काय होईल हे तुला लवकरच कळेल', अशी धमकी देताना दिसत आहे.

नंतर त्या ठिकाणी पोलीस येतात. यादरम्यान, तो पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राजश्रीने राहिलविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर मनसेकडून वारंवार धमक्या येत असल्याचं तिने सांगितलं. व्हिडिओ व्हायरल होताच यावर नेटकऱ्यांच्या संमिश्री प्रतिक्रिया उमटत आहे.

आधीही राजश्री तिच्या एका व्हिडिओ चर्चेत आली होती. महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे, मनसेच्या भूमिकेवर तिने संताप व्यक्त केला होता. तिने व्हिडिओमध्ये इतरांवर भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी अधिक मेहनत करावी, असं तिने म्हटलं होतं. स्थलांतराशिवाय मुंबईतील मराठी लोकांची स्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा दावा तिने व्हिडिओतून केला. तिच्या वादग्रस्त विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर राजश्रीने माफी मागितली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.