Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! आमदार-खासदारांना साडेनऊ लाखात घर, म्हाडाच्या लॉटरीत नेत्यांची चंगळ!

Breaking News! आमदार-खासदारांना साडेनऊ लाखात घर, म्हाडाच्या लॉटरीत नेत्यांची चंगळ!
 

मुंबई: म्हाडा कोकण मंडळाची  पाच हजाराहून अधिक घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. कोकण मंडळाचे लॉटरीत विधानसभा विधान परिषद सदस्य माजी सदस्य यांच्यासाठी 98 घरे म्हाडा लॉटरीत राखीव ठेवण्यात आली आहे. राज्यातील आमदार, खासदारांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घराची किंमत अवघी साडेनऊ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

म्हाडा कोकण मंडळातील घरांच्या लॉटरीत आमदार आणि खासदार कोट्यातील एका राखीव घराची किंमत साडेनऊ लाख ते 11 लाख दरम्यान देण्यात आली आहे. हे घर कल्याणमध्ये असणार आहे. ही घरे अत्यल्प उत्पन्न गटात आहेत, एका आमदाराचे सध्याचे वेतन हे महिन्याला एक लाखापेक्षा जास्त शिवाय महागाई भत्ता वेगळा दिला जात असताना अत्यल्प उत्पन्न गटात नेमके कोणते आमदार यासाठी अर्ज करणार हे पहावं लागेल. दरम्यान, याबाबत म्हाडाकडे विचारणा केली असता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम 1976 नुसार उत्पन्न गटानुसार आमदार-खासदारांसाठी घरे राखीव ठेवावी लागतात. या घरांसाठी आमदार-खासदारांकडून अर्ज न आल्यास ती खुल्या वर्गातील अर्जदारांना उपलब्ध होतात, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कुठे आहेत राखीव घरे?
ठिकाण - उत्पन्न गट - किंमत (लाखांत) घरांची संख्या
कल्याण - अत्यल्प - 9.55 ते 11.31-1
टिटवाळा - अल्प - 17.18 ते 30.56-1
नवी मुंबई - अत्यल्प - 8.59-2
कल्याण - अत्यल्प - 19.60 ते 19.95- 1
विरार - अत्यल्प - 13.29-1
ठाणे - अल्प - 20 ते 21- 1
वसई - अल्प - 14 ते 18- 1
कल्याण - अल्प - 21 ते 22- 49
शिरढोण - अल्प - 35.66- 11

म्हाडा कोकण मंडळाची 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर-

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा तसेच वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत एकूण 5,285 सदनिका, तसेच ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया आज सोमवारी दि. 14 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता, 'गो-लाइव्ह' कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांच्या हस्ते होणार आहे.

सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 1 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार-
या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अर्जदार 14 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाईन भरू शकतील. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्ज या प्रणालीद्वारे तपासले जातील आणि पात्र अर्जांची प्रारूप यादी 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://housing.mhada.gov.in प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील दावे व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.