Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भररस्त्यात तरुणाकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, मुंबईमधील भयंकर घटना; VIDEO पाहून नागरिक संतापले

भररस्त्यात तरुणाकडून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार, मुंबईमधील भयंकर घटना; VIDEO पाहून नागरिक संतापले
 

मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. भररस्त्यावर एका तरुणाने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये ही घटना घडली. एका तरुणाने हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आणला. त्याने याचा व्हिडीओ काढला.

तरुणाने हटकल्यानंतर या तरुणाने कुत्र्याला सोडून दिलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरीच्या वैशालीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. रात्रीच्या अंधारामध्ये एक तरुण रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या वाहनांच्या आडोशाला बसून कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. एका तरुणाने हा सर्व धक्कादायक प्रकार पाहिला आणि त्याने या तरुणाला हटकले. तरुणाला पाहून बिथरलेल्या या व्यक्तीने कुत्र्याला सोडून दिलं. 
 
त्यानंतर हा तरुण तिथून उठून निघून गेला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा तरुण व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाकडे रागाने पाहत आहे. त्यानंतर व्हिडीओ काढणारा तरूण या तरुणाला थांब तू तुला पोलिस ठाण्यात नेतो असे म्हणतो. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. आरोपी तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.