वैद्यकीय विश्वाला मोठा धक्का! कार्डिअॅक सर्जनलाच हृदयविकाराचा झटका; अवघ्या 39 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
चेन्नई : भारतातील नामांकित युवा हृदयशल्यविशारद डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचे केवळ 39 व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. रुग्णांना जीवदान देणारा डॉक्टरच हृदयविकाराच्या झटक्याने कोसळल्याने वैद्यकीय विश्वाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.रुग्ण तपासणीदरम्यान अचानक कोसळले डॉ. रॉय हे रुग्णालयात तपासणी करत असतानाच अचानक कोसळले. तातडीने
सहकाऱ्यांनी सीपीआर, स्टेंटिंग, इंट्रा-एओर्टिक बलून पंप, ईसीएमओ यांसारखे
उपचार केले. रुग्णालयात असल्यामुळे सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध होत्या,
तरीही त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले नाही.
वैद्यकीय क्षेत्राला बसला मोठा धक्का
सध्या ते चेन्नईतील सविता मेडिकल कॉलेजमध्ये कन्सल्टंट कार्डिअॅक सर्जन म्हणून कार्यरत होते. अलीकडेच त्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिसही सुरू केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
डॉक्टरांनाही आरोग्याचा धोका
हैदराबादमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी या घटनेनंतर सोशल मीडियावर महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यांनी म्हटले, "डॉक्टर आजारी पडतात तेव्हा तो समाजासाठीही एक सतर्कतेचा इशारा असतो. डॉ. रॉय यांचे निधन ही पहिली घटना नाही. याआधीही अनेक तरुण डॉक्टरांना हृदयविकाराने जीव गमवावा लागला आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.