Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मराठा असूनही फडणवीसांचे बूट चाटून...', जरांगेंकडून नितेश राणेंना प्रत्युत्तर; चिमणी, चिचुंदरी आणि डुकराची उपमा

'मराठा असूनही फडणवीसांचे बूट चाटून...', जरांगेंकडून नितेश राणेंना प्रत्युत्तर; चिमणी, चिचुंदरी आणि डुकराची उपमा
 

मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार किंवा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून चिमणी, चिचुंदरी आणि डुकराची उपमा दिली आहे. नितेश राणे यांना मंत्रीपद जाण्याची भीती असल्यानेच अशी विधानं करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच आपण यासंदर्भात निलेश राणेंशी बोललो होतो असा खुलासाही 'झी 24 तास'शी बोलताना केला आहे.

नितेश राणेंचा खळबळजनक दावा

"जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार किंवा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा कार्यक्रम कोणी करत असे तर सरकार म्हणून सगळी माहिती आमच्याकडे आहे. पेट्रोलसाठी पैसे कोण देत आहे. त्या मार्गावर लॉजवर राहण्याची सोय कोण करत आहे या सगळ्याची माहिती आहे," असं नितेश राणे म्हणाले आहेत.




मनोज जरांगेंकडून प्रत्युत्तर

मनोज जरांगे यांनी नितेश राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "तुम्ही मराठ्याचे असताना सेवा करायला हवी. जे करतात त्यांची नावं कशाला सांगत आहात. तुम्हाला वाटत असेल मदत करावी तर मग करा ना. मराठे उपाशी मरावेत असं वाटतं का? किती दिवस मराठे असूनही देवेंद्र फडणवीसांचे बूट चाटणार आहात? कधी तरी गरिबांच्या मदतीला या. 96 कुळी मराठा स्वत:ला समजतो, मग कशाला लेंड्या गोळा करत आहात? कोण देतंय याचा काय तपास लावणार आहे. गोरगरिब मराठे वर्गणी काढतात ते खरे 96 कुळी आहेत".
 
"मी त्यांना फार दिवसांपासून ओळखतो. मी फक्त त्यांच्या मोठ्या भावाला, दादांना मानतो म्हणून त्यांना यांना बोलायला लावू नका सांगितलं आहे. पण बहुतेक आता त्यांना मंत्रीपद जाण्याची भीती आहे. मी निलेश राणे यांना बोलायला लावू नका सांगितलं होतं. यांना झोडणार असं म्ह़टलं होतं," असा खुलासा त्यांनी केला आहे.

"कोणी ना कोणीतरी खाऊ घालणारच. पण आम्ही घरुनच सर्व घेऊन गेलो आहोत. जे चोऱ्या करतात त्यांना दुसऱ्यांना चोरी केलं असंच वाटत असतं. इतरांचे कष्टाचे पैसे आहेत. लोकांनी मनाने पेट्रोल, डिझेल, वर्गणी दिल्या आहेत. कोणी देत असेल तर देणाऱ्याचं कौतुक करत तुम्हीही दिलं पाहिजे तर 96 कुळी आहात," असंही त्यांनी सांगितलं. 
 
"प्रवासात चिमणी गाडीवर धडकली तर बाजूला पडून ओरडते. तसंच ते करत आहेत. त्यांना तशी बोलण्याची सवय लागली आहे. चिचुंदरी लोकांच्या तंगड्यातून पळत असते. तिचं घाबरगुंडीचं कामच असतं," असा टोलाही त्यांनी लगावला. मंत्रीपद जाऊ नये यासाठी ते बोलत असून, त्यांचं मंत्रीपद नक्की जाणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली. डुकराप्रमाणे खाण्याची सवय आहे. 96 कुळींचा एकही गुण त्यांच्यात नाही. असते तर लगेच मराठ्यांच्या सेवेसाठी पोहोचले असते अशी टीकाही त्यांनी केली आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.