Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जोगेंद्र कवाडे महायुतीबरोबर गेले, जनतेचा संताप उफाळला? थेट कार्यक्रमातून हाकललं! प्रचंड विरोध अन् 'मुर्दाबाद'च्या घोषणाही

जोगेंद्र कवाडे महायुतीबरोबर गेले, जनतेचा संताप उफाळला? थेट कार्यक्रमातून हाकललं! प्रचंड विरोध अन् 'मुर्दाबाद'च्या घोषणाही
 

नागपूर : लाँग मार्चचे प्रणेते, माजी आमदार तसेच पीपल्स रिपबल्किन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना आज अक्षरशः लोकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळे कार्यक्रम सोडून जावे लागले. ते भाषणाला उभे होताच त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. कवाडे यांचा पक्ष सध्या भाजप महायुतीसोबत असल्याने त्यांचा विरोध करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासंदर्भातील माहिती देशभरातील बौद्ध समाजापर्यंत पोचवण्यासाठी शनिवारी (ता.16) रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात कवाडे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबोधी विहार आंदोलनाचे अग्रणी भंते विनयाचार्य तसेच भगवान बुद्ध यांची भूमिका साकारणारे अभिनेते हिमांशू सोनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात बीटी ॲक्ट 1949 रद्द करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. भंते विनाचार्य हा ठराव मांडणार असून, भारतीय भिक्षसंघाचे भंते रेवत संघनायक, भंते उपगुप्त, भीमराव आंबेडकर, भदंत ज्ञानज्योती, भंते हर्षबोधी यावेळी उपस्थित होते. बुद्धिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्राध्यापक कवाडे हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना आपले मत मांडण्यासाठी आयोजकांनी त्यांना मंचावर आमंत्रित केले. माईक हाती धरताच सभागृहातील प्रेक्षकांनी कवाडे यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात झाली. गोंधळाकडे दुर्लक्ष करून कवाडे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मी भाषणासाठी येथे आलो नाही असेही त्यांनी सांगितले. मात्र गोंधळ आणखीच वाढला. घोषणाबाजीला जोर आला. अनेकांनी मुर्दाबादच्या घोषणा देणे सुरू केले. त्यामुळे कवाडे यांना बोलताही आले नाही. लोकांचा विरोध बघून त्यांना सभागृह सोडावे लागले.

प्राध्यापक कवाडे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी लाँग मार्च काढला होता. या मार्चच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे झाले होते. शेवटी तत्कालीन सरकाराला याची दखल घ्यावी लागली. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे लागले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती.

भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी आंदोलन पेटल्यानंतर सरकारचा निषेध म्हणून त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पीरिपाने शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे महायुती सरकारमध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.