इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालयाचा उद्घाट कार्यक्रम तसेच श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला, या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार
गटाचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना आवाजात
प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व म्हणजे जयंत पाटील आता बोलायला उभं राहातील
असं कार्यक्रमाच्या सूत्रसंचकाने म्हटलं, यावरून अजित पवार यांनी
सूत्रसंचालकाची जोरदार फिरकी घेतली.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
सूत्रसंचलाकांनी सांगितलं. आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील. आम्ही काय देखणे नाही का. च्या आयला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं आणि आमचीच बिनपाण्याने करायची. ते देखणे आणि आम्ही काय बिन देखणे आहोत? तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय येतोय, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं, सोबतच त्यांची चौफेर फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.मी भाषण करत नाही, मी कामाचा माणूस आहे. एक गोष्ट खरी आहे आत्यांनी सांगितलेली जसं मी जन्माला आलोय, तसं मी माई आत्यांना माई म्हणत आलोय. त्यामुळे मी सरोज पाटील, माईसाहेब वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी पाहत होतो, रोहित सारखा माई माई करत होता. त्याची आजी आहे, तरी माई माई करतोय. ठिक आहे, बघतो घरी गेल्यावर काय आहे ते असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं.एनडी मामांना आम्ही एनडी मामा म्हणायचो. मला या कार्यक्रमाचं आमंत्र आलं. संगिता आणि प्रशांत आमंत्रण घेऊन आले होते. आम्ही परिवारातील आहोत. अधूनमधून भेटत असतो. आम्ही सुखदुखात सामील होतो. मी संगिता आणि प्रशांतला विचारलं काय काढलं. त्यावर त्यांनी मला याबाबत माहिती दिली, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.