महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर असलेल्या पुण्यात घरांच्या किंमती एकदम अचानक कमी झाल्या; कारण जाणून शॉक व्हाल
संपूर्ण भारतात घरांच्या किंमती वाढत असताना महाराष्ट्रातील एका मोठ्या शहरात घरांच्या किंमती कमी झाल्या आहेत. हे शहर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. घर खरेदी करणे आता लोकांच्या बजेटबाहेर गेले आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील या शहरात मालमत्तेचे दर घसरत आहेत. महाराष्ट्रातील पुणे शहरात घरांच्या
किंमती कमी झाल्या आहेत. Housing.com च्या अहवालानुसार, पुण्यात घरांच्या
किमती घसरल्या आहेत. पुण्यासह तुलना करता भारतातील इतर शहरांमध्ये घरांच्या
किंमती महाग आहेत. हाऊसिंग डॉट कॉम आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) च्या
अहवालानुसार, गेल्या एका वर्षात पुणे हे भारतातील एकमेव मोठे शहर आहे जिथे
घरांच्या किमती कमी झाल्या आहेत.
पुण्यातील घरांच्या किमंती कमी का झाल्या याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात धक्कादायक कराणे समोर आली आहेत. पुण्यातील आयटी क्षेत्रातील वाढत्या अनिश्चिततेमुळे ही घसरण झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे, विशेषतः अमेरिकेतील मंदीच्या भीतीमुळे, आयटी व्यावसायिकांसारखे घर खरेदीदार मोठी गुंतवणूक करणे टाळत आहेत. तथापि, अहवालात असेही म्हटले आहे की मोठ्या आणि प्रीमियम घरांची (जसे की 3BHK) मागणी अजूनही मजबूत आहे.
या अहवालात पुण्यातील आयटी क्षेत्रातील वाढत्या अनिश्चिततेशी थेट संबंध जोडण्यात आला आहे. पुण्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात आयटी व्यावसायिकांवर अवलंबून आहे. गेल्या काही काळापासून अमेरिकेतील मंदीच्या भीतीमुळे जागतिक आयटी कंपन्या दबावाखाली आहेत. ज्यामुळे नवीन भरती आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे लोक जेव्हा त्यांच्या भविष्याबद्दल चिंतेत असतात तेव्हा ते घर खरेदी करण्यासारखे मोठे आर्थिक निर्णय घेण्याचे टाळतात. याचा थेट परिणाम पुण्यातील घरांच्या विक्रीवर झाला आहे, जेव्हा कमी खरेदीदार असतात तेव्हा मालमत्तेच्या किमतीही खाली येऊ लागतात हे स्पष्ट आहे.तथापि, या अहवालात एक मनोरंजक गोष्ट देखील समोर आली आहे. जरी एकूण बाजारपेठेत घट झाली असली तरी, पुण्यातील मोठ्या आणि प्रीमियम घरांच्या मागणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. विशेषतः 3BHK सारख्या मोठ्या घरांची विक्री अजूनही जोरदार आहे. याचा अर्थ असा की ज्यांना खरोखर घराची आवश्यकता आहे आणि ज्यांचे बजेट स्थिर आहे ते चांगले आणि मोठे घर खरेदी करण्यासाठी या संधीचा फायदा घेत आहेत. ही घसरण पुण्यात स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक संधी असू शकते. त्यांना कदाचित आता पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त दरात घर खरेदी करता येवू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.