Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगाउपअधीक्षक प्रणिल गिल्डा : मिरजेत सुरक्षा वचनबंध कार्यक्रम साजरा

मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा उपअधीक्षक प्रणिल गिल्डा : मिरजेत सुरक्षा वचनबंध कार्यक्रम साजरा
 

मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात येऊ नयेत, आपल्या मुलांना चांगले वळण लागावे, चांगल्या सवयी लागायच्या असतील, तर आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा, असे आवाहन मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले. महात्मा गांधी चौक  पोलिस ठाण्यात आयोजित सुरक्षा वचनबंध कार्यक्रमात ते बोलत होते.

मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून सुरक्षा वचनबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिरजेतील शालेय मुलींसह, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या होत्या. पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे, भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, संदीप गुरव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.