सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचे (ACP) प्रमोशन नाकारणे मुंबईतील २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना चांगलेच महागात पडले आहे.या अधिकाऱ्यानी ज्या हेतूने प्रमोशन नाकारले त्यातील एकही हेतू साध्य झालेला नाही. दरम्यान रिक्त झालेल्या मुंबईतील पोलीस ठाण्यात तसेच वाहतूक विभाग,गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षकांना सेवाजेष्ठते नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.
मुंबईसह इतर जिल्ह्यातील १५६ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना गुरुवारी ‘सहाय्यक पोलीस आयुक्त’ पदी (ACP) पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यामध्ये एकट्या मुंबईतील ३० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सूत्रांच्या म्हणण्या नुसार सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या पदोन्नती साठी २१५ जणांची निवड यादी शासनाकडे पाठविण्यात आली होती. या यादीत मुंबईतील जवळपास ७० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे होती. त्यातील २३ जणांनी काही कारणास्तव प्रमोशन (पदोन्नती) नाकारली होती.दरम्यान फेब्रुवारी महिण्यात सेवानिवृत्त होणाऱ्या ६ अधिकाऱ्यांना एसीपी म्हणून पदोन्नतीचा आदेश काढण्यात आला, त्यानंतर मे महिन्यात ४ आणि जुलै मध्ये ४ असे एकूण १४ जणांना पदोन्नती देण्यात आली होती. उर्वरित १५६ अधिकारी यांच्या पदोन्नतीचा आदेशाचे परिपत्रक गुरुवारी काढण्यात आले,त्यात एकट्या मुंबईतील ३० अधिकारी यांचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी एसीपी ACP प्रमोशन आलेले अधिकारी यांच्या पोस्टिंगचे आदेश तसेच पदोन्नती नाकरणाऱ्या २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बदलीचे आदेश आणि सेवाजेष्ठतेनुसार पोलीस निरीक्षक यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचे आदेशाचे परिपत्रक काढण्यात आले. प्रमोशन नाकारणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची पोलीस ठाण्यातून उचलबांगडी करून अकार्यकारी (साईड पोस्टिंग) पदावर बदली करण्यात आलेली आहे. दरम्यान पदोन्नती आणि बदली नंतर रिक्त झालेल्या ५३ पोलीस ठाण्यात सेवा जेष्ठते नुसार पोलीस निरीक्षक यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा दर्जा देऊन रिक्त झालेल्या पोलीस ठाण्यात पोस्टिंग देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.