Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईमधील मराठा आंदोलनाविरोधात आता विरेन शाहांच्या व्यापारी संघटनेची उडी, म्हणाले, 'आंदोलनामुळे आमचं नुकसान होतंय'

मुंबईमधील मराठा आंदोलनाविरोधात आता विरेन शाहांच्या व्यापारी संघटनेची उडी, म्हणाले, 'आंदोलनामुळे आमचं नुकसान होतंय'
 

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत ओबीसीमधून आरक्षण घेणारच, असा एल्गार पुकारत आझाद मैदानात उपोषण सुरू ठेवलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ दक्षिण मुंबईत मराठ्यांचा वादळ अवतरलं आहे. त्यामुळे हजारो मराठा राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईमध्ये अवतरला आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विरेन शाहांच्या व्यापारी संघटनेने या आंदोलनाविरोधात उडी घेत मराठा आंदोलनामध्ये नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे.

आंदोलन सुरू असल्याने व्यापाऱ्यांना फटका
मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान, राज्य सरकारने यात लक्ष घालण्याची मुंबईतील व्यापाऱ्यांची मागणी असल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटलं आहे. आझाद मैदानावर मराठा मोर्चा मुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे आणि त्याचा मोठा आर्थिक फटका मुंबईतील व्यापाऱ्यांना व्यवसायिकांना बसत असल्याचं व्यापारी संघटनांचे म्हणणं आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या काळात हे आंदोलन सुरू असल्याने त्याचा मोठा फटका दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्याना बसला असून मोठं नुकसान यामुळे व्यापाऱ्याचा होत आहे,असं व्यापारी संघटनांचे म्हणणं आहे. त्यामुळे राज्य सरकारने किंवा उच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून तातडीने तोडगा सोडवण्याची मागणी व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे. 
प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मनोज जरांगेंकडून आर्त साद

आझाद मैदान सुद्धा उपोषणाच्या पहिल्या दिवशी अवघ्या काही मिनिटांमध्येच तुडुंब भरून गेलं आहे. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी मराठा आंदोलक आसरा घेत आहेत आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचा आवाहन दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानातून करत आहेत. जरांगे पाटील यांनी सातत्याने मराठा आंदोलकांना आपल्या मुंबई शहरात वाहने घेऊन न येता नवी मुंबई परिसरामध्ये वाहने पार करून रेल्वेने किंवा बसने आझाद मैदानाकडे येण्याचा आवाहन केलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.