भारतीय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने स्मार्ट टीव्ही डिस्प्लेच्या जीएसटी दरात २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत मोठी कपात केली असल्याने देशभरातील प्रमुख ब्रँड्सनी त्यांच्या टीव्हींच्या किंमतीत हजारो रुपयांची सूट जाहीर केली आहे. थॉमसन, सोनी, एलजी आणि सॅमसंगसारख्या दिग्गज कंपन्या आघाडीवर असून आता २४ इंचाच्या एंट्री लेव्हल स्मार्ट टीव्हीला केवळ ५७९९ रुपयांत मिळवता येईल.
ही घसरण दिवाळी आणि इतर सणांच्या सेलमध्ये खरेदीदारांना आणखी मोठा फायदा देईल, ज्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर विक्रीत वाढ येईल. भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय कंज्युमर ब्रँड थॉमसनने एंट्री लेव्हल स्मार्ट टीव्हींच्या किंमतीत सर्वाधिक कपात केली आहे. यापूर्वी ६४९९ रुपयांना उपलब्ध असलेला २४ इंचाचा मॉडेल आता ५७९९ रुपयांत मिळेल. ही नवीन किंमती २२ सप्टेंबरपासून लागू होत असून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या ई कॉमर्स साइटवर सणासुदीच्या सेलमध्ये आणखी आकर्षक ऑफर्स मिळतील
थॉमसनच्या इतर मॉडेल्सची यादी
३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही आता ७९९९ रुपयांत मिळेल, जो यापूर्वी ८९९९ रुपयांचा होता (१००० रुपयांची सूट).४० इंचाचा स्मार्ट टीव्ही आता ११९९९ रुपयांत उपलब्ध, जो आधी १३९९९ रुपयांचा होता (२००० रुपयांची सूट).४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही आता १३४९९ रुपयांत मिळेल, जो यापूर्वी १५९९९ रुपयांचा होता (२५०० रुपयांची सूट).५० इंचाचा स्मार्ट टीव्ही आता २०९९९ रुपयांत उपलब्ध, जो आधी २४९९९ रुपयांचा होता (४००० रुपयांची सूट).५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही आता २७९९९ रुपयांत मिळेल, जो यापूर्वी ३२९९९ रुपयांचा होता (५००० रुपयांची सूट).६५ इंचाचा स्मार्ट टीव्ही आता ३८९९९ रुपयांत उपलब्ध, जो आधी ४५९९९ रुपयांचा होता (७००० रुपयांची सूट).७५ इंच QD मिनी स्मार्ट टीव्ही आता ८४९९९ रुपयांत मिळेल, जो यापूर्वी ९९९९९ रुपयांचा होता (१५००० रुपयांची सूट).सोनीकडून ५ ते १० टक्के सूट प्रीमियम ब्रँड सोनीनेही आपल्या संपूर्ण रेंजवर ५ ते १० टक्के किंमत कपात जाहीर केली आहे. उदाहरणार्थ ३५००० रुपयांचा स्मार्ट टीव्ही आता ३१५०० रुपयांत उपलब्ध होईल. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना हायएंड फीचर्स असलेले टीव्ही सहज परवडतील. एलजी आणि सॅमसंगसारख्या इतर ब्रँड्सनीही तत्काळ प्रतिसाद देत किंमती कमी केल्या असून, बाजारात स्पर्धा तापली आहे.
ग्राहकांसाठी काय फायदा?
या जीएसटी कपातीमुळे स्मार्ट टीव्ही आता सर्वसामान्यांसाठी परवडणारे झाले आहेत. 4k रिझोल्यूशन, व्हॉईस कंट्रोल आणि स्मार्ट अॅप्ससह मोठ्या स्क्रीनचे मॉडेल्स आता १००० ते १५००० रुपयांची सूट मिळेल. विशेषतः दिवाळी सेलमध्ये हे ऑफर्स खूप वाढतील. तज्ज्ञांच्या मते, ही जीएसटी कपात इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला चालना देईल आणि उत्पादन वाढेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.