दिवसभरात भाकरी, दूध, मक्याची कणसे, भुईमुग आणि देशी ऊस यांचा समावेश होता. 85 वर्षांनंतरही सकाळी 4 वाजता उठून अंघोळ करणे आणि शेतकाम करणे हे त्यांचे नियमित काम आहे. डोक्यात झालेल्या जखमेमुळे डोळा निकामी झाला तरीही आरोग्य ठणठणीत आहे आणि प्रेरणा देणारे जीवन जगत आहेत. मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर
खाद्य पद्धतीमुळे सुखा पाटील यांनी धुमाकूळ घातला आहे. तरुण पणात त्यांचा
आहार कसा असायचा याचे वर्णन त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने
सांगितल्यानंतर 85 व्या वर्षी त्यांची क्रेझ वाढली आहे. सुखदेव पाटील यांचे
मूळ गाव मंगळवेढा तालुक्यातील घरनीकी प्रपंच चालण्यासाठी त्या काळात
मेंढरा मागे पाय तुडवीत ते चालायचे. दिवसभरात त्यांचा आहार कसा होता
याबद्दल त्यांचे मित्र बजरंग कोळी यांनी सांगितल्या नंतर ते प्रचंड व्हायरल
झाले आहेत.
ते हजार पेंढ्या चारा बांधत होते. कामा मुळे त्यांचा आहार सुद्धा मजबूत होता. दिवसभरात 35 भाकरी आणि पाण्या ऐवजी फक्त दूध असा त्यांचा जेवणाची पद्धत होती. एकावेळी 35 मक्याची कणसे आणि एका वाफ्यातील भुईमुगाच्या शेंगा , 5 देशी ऊस खाण्याचा रतीब होता. स्वतः एकटे पत्र्याच्या डब्यांने विहिरीतून पाणी उपसून पिकांना देत होते.चोरांनी मेंढरे चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रतिकार करताना त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसल्याने डोळा निकामी झाला. आज त्यांचे वय 85 आहे. तरीही त्यांची तब्बेत ठणठणीत आहे. गुडघ्यामुळे त्यांना चालता येत नाही. आजही ते पहाटे 4 वाजता उठून थंड पाण्याने अंघोळ करतात. सुखा पाटील यांच्या साठी त्यांच्या आई, आत्या, आणि पत्नी पहाटेपासून चुली पुढं बसून भाकरी थापण्याचे काम करायच्या अशा आठवणी सुखा पाटील यांच्या पत्नी सुशीला सांगतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.