छत्रपती संभाजीनगर : आई बाहेर गेली असल्याने वडिलांना चहा करून दिल्यानंतर भाऊ, मैत्रिणीसह जिमला गेलेल्या 20 वर्षीय तरुणी जिममध्ये अचानक चक्कर येऊन पडली. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना बीड बायपास परिसरात गुरुवारी
सायंकाळी घडली. एकुलती एक मुलगी गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
कोसळला. प्रियंका अनिल खरात वय 20 वर्ष, रा. बीड बायपास, असं मयत झालेल्या
मुलीचे नाव आहे. प्रियंकाने बीफार्मसीचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
बीड बायपास परिसरातील मस्के पेट्रोल पंप शहरजवळ एका अपार्टमेंटमध्ये खरात
कुटुंबीय राहते. अनिल खरात हे देवगाव रंगारी येथे पोलीस हवालदार म्हणून
नोकरी करतात. अनिल खरात यांना प्रियांका आणि यश अशी दोन मुले आहेत.
दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आई बाहेर गेली असल्याने प्रियंकाने वडिलांना चहा करून दिला. महिनाभरापासून प्रियांकाने जिम जॉईन केलं होतं. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास मी जिमला जाऊन येते असं सांगून ती घरातून निघाली. तिच्यासोबत भाऊ यश व मैत्रीण प्रणाली कुलकर्णी सोबत होते. जिममध्ये जाताना तिघे जण हसत खेळत गेले. आनंदाने प्रियांकाने व्यायाम केला. भावाची वाट बघत असताना प्रियंकाला अचानक चक्कर आली त्यानंतर ती खाली कोसळली. यामुळे तिला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना प्रियंकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला यात तिचा मृत्यू झाला. सायंकाळी गादिया विहार येथील स्मशानभूमीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बहीण भावाचं घट्ट मैत्री, भावाला धक्का
प्रियंका खरात आणि तिचा धाकटा भाऊ यश हे दोघे सोबतच लहानाचे मोठे झाले. बहिण भावांमध्ये मैत्रीप्रमाणेच छान बॉण्डिंग होतं. त्यामुळे घरातील काम करण्यासाठी बाहेर जाणं असो किंवा फेरफटका मारण्यासाठी दोघे सोबत जात असत. जिम देखील एकत्र जॉईन केली होती. कायम भावाच्या सावलीप्रमाणे सोबत राहणारी बहीण अचानक गेल्याने भाऊ यश याला मोठा धक्का बसला आहे. या पुढच्या आयुष्यामध्ये बहीण सोबत नसणार असं म्हणत यश ढसाढसा रडत होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.