Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हृदयद्रावक! एकुलत्या एक नातवाचा अपघातात दुर्दैवी अंत; नातवाचा मृतदेह पाहून आज्जीनेही सोडले प्राण; सोलापूरच्या अक्कलकोटमधील घटना

हृदयद्रावक! एकुलत्या एक नातवाचा अपघातात दुर्दैवी अंत; नातवाचा मृतदेह पाहून आज्जीनेही सोडले प्राण; सोलापूरच्या अक्कलकोटमधील घटना
 

सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातूनएकअतिशयधक्कादायकआणि हृदयद्रावक घटना समोरआलीआहे. नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनेहीआपला जीव सोडला आहे. यादुर्दैवी घटने मुळे अक्कलकोट  तालुक्यातील हन्नूर गावातील व्हनमाने कुटुंबा सह परिसरात शोककळा पसरली आहे .

कारने जोरदार धडक दिल्यामुळे आदित्यचा अपघातात मृत्यू
मिळालेल्यामाहितीनुसार, एकुलता एक नातू अपघातात मृत्यू पावला त्यामुळे दुःखसहननझाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारावेळी आजी जनाबाई व्हानमाने यांनीही जीव सोडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावाजवळ आदित्य व्हनमाने या मुलाचा कारने जोरदार धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला होता. आदित्य हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात इयत्ता नववी शिकत होता. आदित्यने शाळा सुटल्यानंतर खाजगी दुचाकीस्वाराला हात करत गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली. मात्र त्याचवेळी दुचाकीवर निघालेल्या आदित्यला एका कारचालकने जोरदार धडक दिली. हि धडक इतकीजोरदारहोतीकि गाडीवरील चालक जखमी झाला, तर दुर्दैवी ठरलेल्या आदित्यचा अपघातात मृत्यू झाला.
आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आजीला धक्का

दरम्यान, आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आजीला धक्का बसला. परिणामी आजीला जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी आजी आणि नातवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे हन्नूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.