गाडी 20 वर्षांची झाली तरीही टेन्शन नाही; बिंधास्त चालवा, पण... केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
वीस वर्षे जुनी गाडी चालवण्यास आता परवानगी मिळणार असली तरी त्यासाठी वाहनमालकांना काही आवश्यक अटी पाळाव्या लागणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या नियमांनुसार वाहनाचे वय वाढल्यावर प्रदूषण नियंत्रण, सुरक्षितता आणि नोंदणी नूतनीकरण या बाबींना अधिक महत्त्व देण्यात येणार आहे. त्यामुळे 20 वर्षांचा टप्पा पूर्ण
केलेल्या गाड्यांसाठी नोंदणीचे नूतनीकरण अनिवार्य ठरणार असून यासाठी
वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागेल. वाहन नूतनीकरण
प्रक्रियेत सर्वप्रथम 'फिटनेस टेस्ट' होणार आहे. या तपासणीत गाडीचे इंजिन,
ब्रेक, लाईट, टायर यांची कार्यक्षमता तपासली जाईल तसेच प्रदूषण उत्सर्जन
(PUC) ठरावीक निकषात आहे का हे काटेकोर पाहिले जाणार आहे. फिटनेस
प्रमाणपत्र मिळाल्यासच गाडी रस्त्यावर ठेवता येणार आहे. यासाठी वेगळे शुल्क
आकारले जाईल. खासगी वाहनांसाठी हे शुल्क जास्त असेल, तर व्यावसायिक
गाड्यांसाठी आणखी कडक अटी घालण्यात आल्या आहेत.
शहर भागात वाढत्या प्रदूषणामुळे जुनी वाहने हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे शहरी भागातील वाहनचालकांना अधिक दबाव जाणवणार आहे. तर ग्रामीण भागासाठी सरकारने थोडीशी शिथिलता जाहीर केली आहे. शेतीसाठी, गावांमधील दैनंदिन वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने या नियमांत थोड्या प्रमाणात सूट घेऊ शकतात. तसेच ग्रामीण भागातील वाहनांच्या नूतनीकरण शुल्कात काही प्रमाणात दिलासा देण्याची तयारी आहे. योजनेचा उद्देश एकीकडे प्रदूषण नियंत्रणावर लगाम घालणे आणि दुसरीकडे नागरिकांना सुरक्षेची हमी देणे हा आहे. वाहनाचे वय वाढल्यावर अपघाताचा धोका आणि दुरुस्ती खर्च वाढत जातो. त्यामुळे नियमित तपासण्या करून गाडी योग्य स्थितीत आहे याची खात्री होणे गरजेचे आहे.नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहनमालकांनी आपल्या गाडीची नोंदणी वेळेत नूतनीकरण करणे, फिटनेस प्रमाणपत्र मिळवणे आणि आवश्यक ती शुल्के भरणे बंधनकारक असेल. वेळेत नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. यामुळे वाहनचालकांनी आता आपल्या गाडीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे.सरकारकडून येत्या काही आठवड्यांत तपशीलवार मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र आत्तापासूनच वाहनधारकांनी तयारीला लागणे आवश्यक आहे. दुप्पट शुल्क, वेगळे नूतनीकरण शुल्क आणि ग्रामीण भागाला दिलासा-या तिन्ही मुद्द्यांवर नागरिकांचे लक्ष लागले आहे. एकूणच, 20 वर्षे जुनी गाडी रस्त्यावर ठेवायची असेल तर ती योग्य प्रकारे देखभाल करणे आणि नवे नियम पाळणे भाग आहे.
वीस वर्षे जुने वाहन नोंदणी शुल्क...
अवैध वाहनांसाठी नोंदणी शुल्क 100 रुपये.मोटर सायकल 2 हजार रुपयेतीन चाकी किंवा 4 चाकी 5 हजार रुपयेहलक्या मोटर वाहनांसाठी 10 हजार रुपयेआयात केलेल्या दुचाकींसाठी 20 हजार रुपयेआयात केलेल्या चार चाकी वाहनांसाठी 80 हजार रुपयेइतर श्रेणीतील वाहनांसाठी 12 हजार रुपये.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.