Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?
 

केरळमध्ये दुर्मिळ आणि घातक अशा मेंदूतील संसर्ग अमीबिक मेनिन्जोएन्सेफलाइटिसमुळे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या आजाराने १९ जणांचा मृत्यू झालाय. यात अनेक मृत्यू हे गेल्या काही आठवड्यात झाले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य अधिकारी प्रायमरी अमीबिक मेनिन्जोएन्सेफलाइटिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर सतर्क झाले आहेत.

मेंदूतील हा असा संसर्ग आहे ज्यामुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. नेग्लेरिया फाउलेरिमुळे हा संसर्ग होतो. याला मेंदू खाणारा अमीबा असंही म्हटलं जातं. केरळमध्ये २०२५मध्ये ६१ जणांना या आजाराची लागण झालीय. यातील १९ जणांचा मृत्यू झाला. हा आजार दुर्मिळ असून अमीबा असलेल्या तलावात पोहणाऱ्या २६ लाख लोकांपैकी केवळ एकालाच याची लागण होते.

केरळच्या आऱोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुलै महिन्यात मेंदूच्या तापाची प्रकरणे वाढली. यानंतर राज्याच्या उत्तर जिल्ह्यात विहिरी आणि तलावांमध्ये क्लोरीन फवारलं गेलं. स्वच्छता मोहिम राबवली गेली. केरळ सध्या गंभीर अशा आव्हानाचा सामना करत असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय. सुरुवातीला कोझिकोड आणि मलप्पुरम सारख्या जिल्ह्यात काही रुग्ण आढळले होते. मात्र आता राज्यात इतर ठिकाणीही रुग्णांना या आजाराची लागण झाल्याचं दिसून येतंय.
 
आरोग्य मंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या की, तीन महिन्यांच्या बाळापासून ९१ वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकांना याची लागण झालीय. गेल्या वर्षी एकाच ठिकाणी पोहोलेल्यांमध्ये याची लागण झाल्याचं आढळळं होतं. पण यावेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे हा संसर्ग कसा होतोय हे शोधण्याचं आव्हान निर्माण झालंय.

मेंदू खाणाऱ्या अमीबाचा संसर्ग झाल्यानंतर मेंदूतील पेशी नष्ट होण्यास सुरुवात होत्या. अनेक रुग्णांच्या मेंदूला सूज आल्याचंही आढळलं. त्यानंतर रुग्णांचा मृत्यू होतो. हा दुर्मिळ आजार असल्याचं केरळ सरकारने म्हटलंय. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग होत नाही. स्थिर, ताज्या आणि गरम पाण्यातून याचा संसर्ग होतो. नाकाद्वारे हा अमीबा शरिरात प्रवेश करतो.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.