तिन्ही शहरातील सुजाण नागरिक यांनी बेकायदेशीर गोटा, मोकाट जनावरांच्या मालकांच्या पत्ता ,माहिती देऊन सहकार्य करावे, मनपास कारवाईस सुलभता होईल:-मा सत्यम गांधी आयुक्त शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, वाहतूक शिस्तीकरिता तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोकाट जनावरांवर कारवाई करणे महापालिकेस आवश्यक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील तरतुदीनुसार तसेच स्थानिक पातळीवरील नियमावलीनुसार सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनास सार्वजनिक ठिकाणी फिरणारी व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी मोकाट जनावरे पकडण्याचा व हलविण्याचा कायदेशीर करत असते ,प्रसंगी फौजदारी गुन्हे देखील दाखल करत आहे. प्रभाग समिती निहाय पथक व्दारे सतत
कारवाई करण्यात येत असते मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर यांनी मनपा
क्षेत्रातील सर्व वार्ड निहाय भागात भटकी जनावरे पकडण्यासाठी नियोजन मा उप
आयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली केले आहे,
सध्या होत असलेली कारवाईचे तपशील :
मनपाचे विशेष पथक रोज ठराविक भागात फिरून मोकाट जनावरे पकडून कोडवड्यात हलवत आहे. या जनावरांचे मालक सापडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड भरल्यानंतरच जनावरे परत दिली जातात.या कामी पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाते.
पुनःपुन्हा नियम मोडणाऱ्या मालकांविरोधात अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे.
सन २०२१पासून साधारणपणे ५०००वर भटक्या कुत्र्यावर नसंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे अशी माहिती डॉ गोस्वामी यांनी दिली आहे,
मा सत्यम गांधी आयुक्त यांनी नागरिकांनी घ्यावयाची काळजी बाबत सूचना केल्या आहेत
रस्त्यावर मोकाट जनावरांना खाऊ घालणे टाळावे.
घरगुती व व्यावसायिक कचरा वेळेवर व नियमानुसारच द्यावा, जेणेकरून जनावरे रस्त्यावर आकर्षित होणार नाहीत.
मोकाट जनावरांचा त्रास आढळल्यास नागरिकांनी त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षास कळवावे.
वाहतुकीदरम्यान जनावरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे व संयमाने वाहन चालवणे आवश्यक आहे.
या शिवाय या मोकाट जनावरांना बाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत
पकडलेल्या जनावरांच्या कानावर ओळख टॅग (Ear Tag) लावून मालक ओळखण्याची प्रक्रिया सुरू करणे बाबत सबधितांना सूचना दिल्या आहेत.
शहराबाहेर स्वतंत्र गोठ्याची,अन्य चांगली स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे
जनजागृतीसाठी नियमित मोहिमा राबवून नागरिकांना तसेच मालकांना कायदेशीर जबाबदारीची जाणीव करून देण्यात येत आहे.
महापालिकेचे वतीने अहवान करण्यात येत की शहर सुटसुटीत, सुरक्षित व स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या कारवाईबरोबरच नागरिकांनीही शिस्तबद्ध सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. मोकाट जनावरांची समस्या ही प्रशासनाची आहे त्याच बरोबर संपूर्ण समाजाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन करून या समस्येवर नियंत्रण आणण्यास हातभार लावावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.