सांगली, दि 22.: सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली नुकतीच “आमदार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सजावट स्पर्धा” संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सांगली विधानसभा
क्षेत्रातील १८ ते २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवून उत्साहात
सजावटी सादर केल्या. स्पर्धेचे प्रमुख विषय ‘ऑपरेशन सिंदूर’ व ‘स्वदेशी’
असे होते.
🥇 सावकार गणेशोत्सव मंडळ, सांगली — प्रथम क्रमांक(रुपये 15,000)🥈 ओंकार क्रीडा विकास मंडळ, बुधगाव — द्वितीय क्रमांक(रुपये 10,000)🥉 सांगली फ्रेंड सर्कल, सांगली — तृतीय क्रमांक(रुपये 5,000)या स्पर्धेसाठी श्री. मुकुंद पटवर्धन, श्री. विश्वजीत पाटील, श्री. अतुल माने व श्री. केदार खाडीलकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी सर्व विजेत्या मंडळांचे अभिनंदन करत सांगितले की, लवकरच या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.