Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शासकीय इमारतीत रंगली दारू पार्टी, जिल्हा परिषद अभियंत्यांचा प्रताप

शासकीय इमारतीत रंगली दारू पार्टी, जिल्हा परिषद अभियंत्यांचा प्रताप
 

चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेमध्ये अभियंत्यांची ओली पार्टी रंगली होती. या अभियंत्यांना पार्टी करताना रंगेहाथ पकडले. शासकीय इमारतीमध्ये ही पार्टी रंगली होती. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पाच सहा अभियंते जिल्हा परिषदेच्या वसंत भवन या शासकीय विश्रामगृहात ओली पार्टी करीत असल्याची माहिती आपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून त्यांनी वसंत भवनच्या खोली क्रमांक १०७ मध्ये जाऊन बघितले असता याठिकाणी जंगी दारु पार्टी रंगल्याचे दिसून आले. वसंत भवन ही वस्तू जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे निवासस्थान आहे. सरकारी मालमत्ता आहे. अशा शासकीय इमारतीत हे अभियंते दारू ढोसत असल्याने ते गैर ठरले. 
 
आपच्या पदाधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून घटनास्थळी येण्याची मागणी केली. मात्र त्यांनी व्हॉट्सॲपवर माहिती पाठवा, असे सांगत येणे टाळले, अशी माहिती आपने दिली. दरम्यान यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते देखील उपलब्ध होऊ शकले नाही. सध्या या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.