Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अबब!:१२८ किलो वजनाची पत्नी अंगावर पडली अन पतीचा गेला जीव

अबब!:१२८ किलो वजनाची पत्नी अंगावर पडली अन पतीचा गेला जीव
 

१२८ किलो वजन असलेली पत्नी अंगावर पडल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना राजकोटमध्ये घडली आहे. पहाटेच्या सुमारास एका कुटुंबात घडलेल्या या अपघातात ६८ वर्षीय पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

नटवरलाल (रामधाम सोसायटी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून मंजुलाबाई (वय ६५) असे जखमी पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजता नटवरलाल यांचा मुलगा आशीष याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाची तब्येत बिघडल्याने घाबरलेल्या मंजुलाबाई (वय ६५) घाईघाईने जिन्याने वरच्या मजल्यावर जात होत्या. मात्र, याच दरम्यान त्यांचा पाय अचानक घसरला आणि सुमारे १२८ किलो वजन असलेल्या मंजुलाबाई तोल जाऊन खाली पडल्या. दुर्दैवाने, त्या थेट खाली उभ्या असलेल्या त्यांचे पती नटवरलाल यांच्या अंगावर पडल्या. 
 
हा आघात इतका जोरदार होता की नटवरलाल यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली. कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नटवरलाल यांना मृत घोषित केले. जास्त वजनाच्या आघातामुळे त्यांच्या डोक्याला खोलवर जखम झाली होती, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. मंजुलाबाईंनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.