जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद वाटतं नाही, काही तर गडबड आहे; गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या
सांगली : राजकीय विरोधकांवर टीका करताना काही मर्यादा पाळाव्या लागतात ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना सगळ्याच मर्यादा ओलांडल्याचं दिसून आलं. जयंत पाटलांनी आपल्याला एका प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं. सांगली जिल्ह्यातील जतमध्ये बोलत असताना पडळकरांनी हे वक्तव्य केलं. जयंत पाटलांनी आपल्याला एका
कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप
गोपीचंद पडळकरांनी केला. आपण कोणत्या व्यापाऱ्याकडून खंडणी घेतोय का ही
माहिती घेण्यासाठी जतमध्ये माणसे पाठवली. ही राजारामबापू पाटील यांची औलाद
असेल असं वाटत नाही, काहीतरी गडबड आहे अशा खालच्या शब्दात पडळकरांनी केला.
गोपीचंद पडळकरांचे भाषण जसेच्या तसे
मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडवकण्यासाठी जयंत पाटलांनी प्रयत्न केला. याने महाराष्ट्र कसा चालवला, जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही. जयंत पाटलाचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करण्याचं आहे. पण मी काय आता आलोय का? असे अनेक अंगावर घेऊन आलोय. या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय.जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिलं. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे.
या आधीही सातत्याने टीका
सांगलीमध्ये
जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हा वाद चांगलाच पेटल्याचं दिसून येतंय.
गोपीचंद पडळकरांनी या आधीही सातत्याने जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
त्याला जयंत पाटलांनीही उत्तर दिलं. पण गोपीचंद पडळकरांनी जतमध्ये
केलेल्या वक्तव्यावर आता वाद होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.