Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जुनं वाहन खरेदी किंवा विक्री करताय तर थांबा! पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले 'हे' आदेश वाचा

जुनं वाहन खरेदी किंवा विक्री करताय तर थांबा! पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले 'हे' आदेश वाचा

राज्यात सर्वत्र जुन्या वाहनांची खरेदी-विक्री सर्रासपणे केली जाते. अगदी सोशल मीडियावर जाहिरात टाकून देखील आपलं वाहन एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला विकण्यात येतं.

तसंच शहरात अनेक एजंट देखील वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार करून देतात. मात्र या व्यवहारांमुळं गुन्ह्याच्या उकल होण्यास अडचण येत निर्माण होत आहेत, त्यामुळं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहेत.

पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जुनी वाहनं खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून होणाऱ्या वाहन खरेदी-विक्री संदर्भातील संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणं बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी माहिती न दिल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २२४ अन्वये कारवाई करण्यात येईल, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, ग्रामीण भागामध्ये वाढत्या नागरी वसाहतींमुळं जुन्या मोटारसायकली व इतर वाहनांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतू, याबाबत योग्य तपशील न ठेवल्यामुळं चोरीच्या वाहनांची खरेदी-विक्री होण्याची शक्यता वाढत असून गुन्ह्यांच्या उघडकीस येण्यास अडथळा निर्माण होत आहे, या पार्श्वभूमीवर हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार आहेत.

व्यावसायिकांनी खरेदी-विक्री होणाऱ्या वाहनांचा क्रमांक, इंजिन व चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव व संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ओळखपत्र, वाहनांचे आरसी, टीसी पुस्तक, तसेच खरेदीदाराचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र यासह तपशीलवार माहिती संकलित करून दर ७ दिवसांनी संबंधित पोलीस ठाण्याला सादर करणं आवश्यक राहील, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.