सरकारी नोकरी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्रेड बी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आरबीआयने या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या
नोकरीसाठी अर्जप्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज
करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत
वेबसाइट opportunities.rbi.org.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. त्यामुळे
इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आरबीआय ग्रेड बी पदांसाठी एकूण १२० जागा भरती करणार आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या जनरल, DISM, DEPR विभागात ही भरती केली जाणार आहे. चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे. आरबीआय ग्रेड बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. इकोनॉमिक्स, फायनान्समध्ये मास्टर्स, पीजीडीएम किंवा एमबीए डिग्री प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वयोगटातील असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा होणार आहे.१८-१९ ऑक्टोबर या कालावधी फेज १ परीक्षा होणार आहे. त्यानंतर ६-७ डिसेंबर रोजी फेज २ परीक्षा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी परीक्षेची तयारी करावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.