Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
 

जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते. एकूण मतदान 768 झाले होते, परंतू १५ मते अवैध ठरली आहेत. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली आहेत. तर बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली आहेत. एनडीएची मते वाढल्याने इंडिया आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे. 
 
लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त आहेत. तर १३ खासदारांनी मतदान केलेले नाही. एकूण ७८१ मतदान होणे अपेक्षित होते. परंतू, १३ मते पडलेली नाहीत. यामुळे आता 768 मतांची मोजणी केलाी जाणार आहे. मतदान न करणाऱ्यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि अपक्ष १ अशा खासदारांचा समावेश आहे. एनडीएच्या ४२७ खासदारांनी मतदान केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.