Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गेवराईचा बंगला माझ्या नावावर पाहिजे नाही तर.नर्तकीची बीडच्या माजी उपसरपंचाला धमकी आणि थेट गाडीतच..

गेवराईचा बंगला माझ्या नावावर पाहिजे नाही तर.नर्तकीची बीडच्या माजी उपसरपंचाला धमकी आणि थेट गाडीतच..
 

बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावात शोककळा पसलीये. गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी जीवनयात्रा संपवली. मात्र, त्यांच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. कुटुंबियांनी थेट पोलिसात धाव घेतलीये. गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याची सवय होती आणि त्यामुळेच त्यांना टोकाचे पाऊस उचलत थेट स्वत:वर गोळ्या झाडत आयुष्य संपवावे लागले. थापडीतांडा कला केंद्रात जात असताना गोविंद यांची भेट ही पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. पूजा दिसण्यास सुंदर आणि अवघ्या 21 वर्षाची. गोविंद पूजासाठी दररोजच कला केंद्रात जात. गोविंदचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता आणि त्यामधून तो चांगला पैसा कमावत. शिवाय तो राजकारणातही सक्रिय होता.

कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात हळूहळू गोविंद पूर्णपणे बुडाला. तो हे देखील विसरून गेला की, त्याची एक मुलगा आणि मुलगा आहे. त्याने पूजा गायकवाडला महागडा फोन आणि कित्येक सोन्याचे दागिने प्रेमात दिले. मात्र, पूजाची नजर पडली ती म्हणजे गोविंद याच्या गेवराई येथील टोलेजंग बंगल्यावर…आणि तेथूनच खरा वाद सुरू झाला. पूजाने गोविंदच्या मागे गेवराईतील त्याचा आलिशान बंगला आपल्या नावावर करण्यासाठी तगादा लावला. गोविंदच्या गेवराईतील त्या बंगल्यात त्याचे कुटुंब राहत. फक्त गेवराई येथील बंगलाच नाही तर पूजाने तिच्या भावाच्या नावावर गोविंदच्या नावावर असलेली पाच एकर जमीन करण्यासाठीही सांगितले. मात्र, गोविंद पूजाचे म्हणणे ऐकत नव्हता. 
 
शेवटी पूजाने गोविंदसोबत बोलणे पूर्णपणे बंद केले. गोविंद पूजाला सतत फोन करत होता आणि तिला भेटण्यासाठी प्रयत्न करत राहिला. शेवटी गोविंद हा पूजाच्या बार्शीतील सासुरेगावात पोहोचला. तिथे दोघांची भेट झाली. मात्र, पूजा आपल्या गेवराईच्या बंगल्याच्या अटीवर ठाम होती. हेच नाही तर तिने थेट धमकी गोविंदला दिली की, तो बंगला माझ्या नावावर कर…नाही तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. पूजाच्या घरातून गोविंद रात्री निघाला. मात्र, त्याने पूजाच्या घरापासून काही अंतरावरच स्वत:वर बंदूकीतून गोळी झाडली आणि आयुष्याचा शेवट केला. गोविंदच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाल्याचे सध्या बघायला मिळतंय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.