नेपाळमध्ये आंदोलकांचे आक्रमक रूप पहायला मिळालं. आंदोलक नागरिकांनी अनेक मंत्र्य़ांची घरे जाळली, तसेच देशाच्या संसद भवनालाही आग लावली. या आंदोलनामुळे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला आहे. नेपाळमधील हिंसाचार सध्या जगभरात चर्चेत असताना आता आणखी एक देशात जाळपोळीला सुरुवात झाली आहे. लोक रस्त्यांवर उतरले असून जाळपोळ आणि घोषणाबाजी सुरु आहे. हा देश कोणता आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फ्रान्समध्येही लोक रस्त्यावर उतरले
नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोकांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात ब्लॉक एव्हरीथिंग नावाच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज आंदोलकांनी देशातील विविध महामार्ग रोखले. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सध्या सर्वत्र गोंधळ सुरु आहे. आंदोलकांनी काही बसेस आग लावली असल्याचे समोर आले आहे.आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा फौजफाटा तैणात करण्यात आली आहे. मात्र तरीही पॅरिससह अनेक मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. फ्रान्समध्ये सध्या राजकीय गोंधळ सुरु आहे. संसदेत अलीकडेच पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांच्याविरोधात विश्वासदर्शक ठराव आणला होता, यात त्यांनी बहुमत सिद्ध करण्यात त्यांना आपयश आले आहे. त्यानंतर आता तीव्र आंदोलन सुरु झाले आहे, त्यामुळे देशात गोंधळ उडाला आहे.
ब्लॉक एव्हरीथिंग म्हणजे काय?
ब्लॉक एव्हरीथिंग हे फ्रान्समधील आंदोलनाचे नाव आहे. यामागचा उद्देश असा आहे की, देशाची सध्याची राजकीय व्यवस्था आता जनतेसाठी उपयुक्त नाही. ही व्यवस्था उजव्या विचारसरणीच्या लोकांनी सुरू केली होती, मात्र आता ती डाव्या आणि अति-डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांचे म्हणणे आहे की, जर व्यवस्था काम करत नसेल तर देशातील यंत्रणा बंद करा. त्यामुळे आंदोलकांनी महामार्ग, शहरे आणि वाहतूक व्यवस्था बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे याला ब्लॉक एव्हरीथिंग असे म्हटले जात आहे. देशातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 80 हजार सैनिक तैणात केले आहेत. यातील 6000 सैनिक पॅरिसमध्ये असणार आहेत. फ्रेंच माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार सुमारे 1 लाख लोक या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.