Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अंत्यसंस्काराचे पैसे देण्यास भाजपचा नकार, कुटुंबीयांकडूनच पैसे घेण्याचा नेत्यांचा सल्ला

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अंत्यसंस्काराचे पैसे देण्यास भाजपचा नकार, कुटुंबीयांकडूनच पैसे घेण्याचा नेत्यांचा सल्ला
 

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या अंत्ययात्रेचा खर्च उचलण्यास भाजपने नकार दिला आहे. रुपाणी यांच्या अंत्यसंस्कारात 20-25 लाख रुपये खर्च झाले होते. हा खर्च त्यांच्या कुटुंबीयांकडून घ्या असे पक्षाने सांगितले आहे. दिव्य भास्करने याबाबात वृत्त दिले आहे. रुपाणी यांच्या अंत्ययात्रेदरम्यान फुलं, मंडप आणि इतर व्यवस्था करणारे व्यापारी जुलै महिन्यात रूपाणी यांच्या घरी गेले आणि कुटुंबाकडे पैशांची मागणी केली. पक्षाकडून पैसे दिले गेले नाहीत हे कळल्यावर कुटुंबाला धक्का बसला. मात्र रुपाणी यांच्या कुटुंबीयांनी हे पैसे चुकते केले. रूपाणी यांच्या कुटुंबातील मित्राने सांगितले इथे पैशांचा प्रश्न नाही, पण भाजपचे हे वर्तन अतिशय वेदनादायी आणि दुःखद आहे. पक्षाने याबद्दल आधी कोणतीही माहितीही दिली नाही असेही त्यांनी सांगितले. 

कुटुंबाच्या जवळच्या लोकांनी सांगितले की विजय रूपाणी यांनी आपले संपूर्ण जीवन भाजप आणि समाजसेवेला अर्पण केले होते. अशा वेळी त्यांच्या अंत्ययात्रेचा खर्च उचलण्यापासून पक्ष मागे हटणे हे कुटुंबासाठी अतिशय दु:खद होते. कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांना पैशांची कमतरता नाही, परंतु पक्षाचे असे वर्तन मानवतेच्या आणि सन्मानाच्या दृष्टीने योग्य मानले जाऊ शकत नाही. विजय रूपाणी यांचे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान दुर्घटनेत निधन झाले होते. त्यांच्यांवर 16 जून रोजी राजकोट येथे शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.