सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीला वित्त विभागाची मंजूरी.. भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या मागणीला यश...
खासगी शिक्षणसंस्था आणि हंगामी सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला..
पृथ्वीराजबाबा पाटील
सांगली दि. १९: राज्यातील ६२०० प्राध्यापक व २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा जीआर तातडीने काढून दिवाळीपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मंत्री महोदयांनी भरतीचा जीआर काढणार असे आश्वस्त केले होते. आज वित्त विभागाची भरतीला मंजुरी मिळाली आहे असे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यापूर्वी भरतीला मंजुरी दिली होती. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भरती प्रक्रिया सुरु होण्यासाठी वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला होता. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरती प्रक्रिया महत्वाची होती.या निर्णयामुळे अनेक वर्षे अनुदानित महाविद्यालयाकडे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हंगामी शिक्षकांना न्याय मिळेल आणि प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार आणि ना. एकनाथजी शिंदे व ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो असे पृथ्वीराजबाबा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.वित्त विभागाच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीला मंजूरीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकात समाधान व्यक्त केले जात आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.