Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'पडळकर, लाड, दरेकर, खोत, चित्रा वाघ छपरी भाषेत...', संतापलेल्या शरद पवारांच्या पक्षाचं फडणवीसांना चॅलेंज

'पडळकर, लाड, दरेकर, खोत, चित्रा वाघ छपरी भाषेत...', संतापलेल्या शरद पवारांच्या पक्षाचं फडणवीसांना चॅलेंज
 

भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. असं असतानाच शरद पवारांच्या पक्षाने अत्यंत कठोर शब्दांमध्ये या प्रकरणावर पहिली अधिकृत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

राज्यातील संस्कृतीला काळिमा
"भाजपने मोकाट सोडलेल्या वाचाळवीर पडळकरने ज्याप्रकरणे जयंत पाटीलांवर टीका केली ती निंदनीय आणि निषेधार्थ आहे. स्वर्गीय राजारामबापूंचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे, ज्यांनी सहकाराची पाळेमुळे राज्यात रुजवली अशा सुसंस्कृत व्यक्तीवर टीका करणं हे राज्यातील संस्कृतीला काळिमा फासणारे आहे," असं शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे.
ठाकरे, महाजन, मुंडे, गडकरी अनेक दिग्गज...

"शरद पवार सत्ता पक्षात असताना महाराष्ट्राने अनेक दिग्गज आणि सुसंस्कृत विरोधी पक्षनेते पाहिले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांसारख्या नेत्यांनी पवारांवर कठोर राजकीय टीका केली, परंतु कधीही खालच्या भाषेत, वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवर जाऊन अवमान केला नाही," अशी आठवण रविकांत वरपेंनी करुन दिली आहे.

राज्याची संस्कृती पायदळी तुडवत...
"आजच्या राजकारणात गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, चित्रा वाघ यांसारखे नेते छपरी भाषेत, राज्याची संस्कृती पायदळी तुडवत विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत. कालच जयंतराव पाटील साहेबांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका हे याचं उदाहरण आहे," असा टोला रविकांत वरपेंनी लगावला आहे.
छपरी संस्कृती...

"यामागचं कारण स्पष्ट आहे आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे, मुंडे साहेब, प्रमोद महाजन किंवा नितीन गडकरी टीका करायचे, तेव्हा देशात सुसंस्कृत अटल बिहारी वाजपेयी यांचं नेतृत्व होतं. आज मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात राजकीय संवादाची पातळी खालावली आहे. त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो. ही छपरी संस्कृती म्हणजेच महाराष्ट्राला मिळालेली "फडणवीस संस्कृती" म्हणायची का?" असा

हकालपट्टी करण्याची धमक...
"पडळकर यांनी जी भाषा वापरली ती भाषा देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मान्य आहे का? मान्य नसेल तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची धमक देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी," असं थेट आव्हान शरद पवारांच्या पक्ष प्रवक्त्यांनी केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.