सांगली : जबरी चोरी, दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सागर धनाजी लोखंडे (वय 32, संपत चौक, साखर कारखानाजवळ), राज दर्याप्पा यादव (वय 22, रा. चिंतामणीनगर, झोपडपट्टी), अजय राजेंद्र पाटील (वय 25, रा.गजेंद्र चौक, शांतिनिकेतनजवळ, सांगली) या तिघांना दोन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही कारवाई केली.
संजयनगर पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सागर लोखंडे, राज यादव, अजय पाटील या तिघांविरुद्ध 2020 ते 2024 या कालावधीत गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, घातक शस्त्र बाळगणे, चोरी, चोरीचा प्रयत्न करणे, घरफोडी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, असे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.