मांजर्डे : खेळताना पाण्याच्या बादलीत पडून एकुलत्या एका चिमुकलीचा मृत्यू झाला. मांजर्डे (ता. तासगाव) येथे गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तन्वी शिवाजी कदम-घोटकर (वय एक वर्ष) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. गावातील पत्रा वस्ती भागात कदम कुटुंबीय
राहतात. सकाळी तन्वी नेहमीप्रमाणे घरात खेळत होती. आई घरकामात व्यस्त
होती. तन्वी रांगत रांगत पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेली व बादलीमध्ये
पडली. ही घटना लक्षात येताच आईने तिला बाहेर काढले व पतीला तत्काळ फोन करून
बोलावून घेतले. त्यानंतर कुटुंबीयांनी तन्वीला तासगाव येथील रुग्णालयात
दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.