Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज :- ड्रग्ज तस्करी करणारा सराईत गुन्हेगार हुसेन सय्यद जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांचा प्रस्ताव प्रांतधिकाऱ्यांनी केला मंजूर

मिरज :- ड्रग्ज तस्करी करणारा सराईत गुन्हेगार हुसेन सय्यद जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांचा प्रस्ताव प्रांतधिकाऱ्यांनी केला मंजूर
 

मिरज :- ड्रग्ज तस्करीसह गंभीर गुन्हे दाखल असलेला मिरजेतील सराईत गुंड हुसेन सय्यद याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली. हुसेन बादशाह सय्यद (वय २७, रा. कैकाडी गल्ली, हिंदू धर्मशाळेमागे, मिरज) असे हद्दपार केलेल्याचे नाव आहे. 'नशामुक्त भारत अभियानांतर्गत' अंमली पदार्थांची विक्री, साठा, तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सहायक निरीक्षक शिंदे यांनी सय्यद याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्फत मिरजेच्या प्रांतधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

प्रांतधिकाऱ्यांनी यावर सुनावणी घेऊन सय्यद याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्ह्याबाहेर सोडले आहे. मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक संदीप गुरव, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, नानासाहेब चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, एलसीबीकडील बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.