Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जनावरं मेली, तात्काळ मदत द्या.. शेतकऱ्यांच्या मागणीवर मंत्री महाजनांनी केलं असं वक्तव्य.. राज्यात संतापाची लाट

जनावरं मेली, तात्काळ मदत द्या.. शेतकऱ्यांच्या मागणीवर मंत्री महाजनांनी केलं असं वक्तव्य.. राज्यात संतापाची लाट
 

राज्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घेतला असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह घरं, जनावराचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने संताप व्यक्त होत आहे. 
 
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन धाराशिव दौऱ्यावर होते धाराशिवमधील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात शेतकऱ्यांचे शेकडो जनावरं वाहून गेले आहेत. गिरीश महाजन आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. जनावर मेली आहेत तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या या मागणीवर मंत्री महाजन यांनी असं वक्तव्य केलं, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नेमकं काय म्हणाले मंत्री महाजन?
मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो, मी पैसे घेऊन आलो नाही असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. तर महाजन यांच्या असंवेदनशीलतेवर विरोधकांनी टीका केली. शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे निघाले. 
 
मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. तुम्ही जसे भाजप सरकारचे संकट मोचक झालात तसं शेतकऱ्याचं का होत येत नाही, असा सवाल कडू यांनी चंद्रपूर येथे माध्यमांशी बोलताना विचारला. किमान चांगलं बोलता येत नसेल तर जावू नका न कोणी आग्रह केला, असा सवाल त्यांनी केला. देत तर काहीच नाही उलटून अशी भाषा करत असेल तर निषेध करतो असे बच्चू कडू म्हणाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.