Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं! PI किरणकुमार बकाले पोलीस सेवेतून बडतर्फ

मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं! PI किरणकुमार बकाले पोलीस सेवेतून बडतर्फ
 

पोलीस दलात खळबळ उडवून देणारी एक बातमी आहे. वादग्रस्त वक्तव्य करणं एका पोलीस निरीक्षकाला भोवलं आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

याबाबतचे आदेश पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काढले.
खरंतर किरणकुमार बकाले याने अधिनस्त कर्मचाऱ्याशी फोनवर बोलताना मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबाबतची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यानंतर जळगावसह राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. जळगावातील छत्रपती शिवाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने करत किरणकुमार बकालेला बडतर्फ करण्याची मागणी केली. 
 
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या चौकशीनंतर बकाले यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना समक्ष सुनावणीची संधी दिली असली तरी नवे मुद्दे मांडता न आल्याने सेवेतून बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला. संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली. छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या निर्णयाचे स्वागत करत हा मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.