बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर (क्रेडिट अॅनालिस्ट) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रेड स्केल ३ अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. स्टेट बँकेतील ही भरती एकूण ६३ पदांसाठी होणार आहे. त्यातील रेग्युलर ५८ पदे भरली जाणार आहेत तर बॅकलॉगसाठी ५ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी sbi.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ ते ३५ असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय निवड होणार आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
स्टेट बँकेतील नोकरीसाठी पात्रता
स्टेट बँकेतील मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत एमबीए (फायनान्स)PGDBA/PGDBM/MMS (फाइनान्स)/सीए/सीएफए/ICWA पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. याचसोबत ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
पगार
स्टेट बँकेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल ३ पदावर नियुक्त केले जाणार आहे. यासाठी ६ महिन्याचा प्रोबेशन कालावधी असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्ते, एचआरए, डीए, पीएफदेखील मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.