Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोव्यात परदेशी महिलेवर सोलापूरच्या डॉक्टराकडून बलात्कार; ICU रूममध्ये घाणेरडं कृत्य

गोव्यात परदेशी महिलेवर सोलापूरच्या डॉक्टराकडून बलात्कार; ICU रूममध्ये घाणेरडं कृत्य
 

गोव्यात एक लज्जास्पद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या गोव्यातील हेल्थवे रूग्णालयात दाखल असलेल्या २४ वर्षीय मोरोक्कन महिला रूग्णावर आयसीयूमध्ये बलात्कार झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या घृणास्पद कृत्याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर येथील २८ वर्षीय डॉक्टर वृषभ दोशीला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. नंतर दिवार बेटाजवळील एका एनजीओच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्यात पोहोचली होती. प्रशिक्षणादरम्यान, तिची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने हेल्थवे रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये दाखल केले. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना, सोलापुरातील आरोपी डॉक्टर तपासणीच्या बहाण्याने आयसीयूमध्ये गेला. दुसऱ्या नर्सला बाहेर पाठवले. नंतर महिला रूग्णावर लैंगिक अत्याचार केला. 
 
पीडितेनं पोलिसांना सांगितले की, जेव्हा डॉक्टर तिच्याकडे तपासणीसाठी आले, तेव्हा त्यांच्यासोबत एक नर्स देखील होती. परंतु, डॉक्टरांनी नर्सला बाहेर पाठवले. नंतर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी डॉक्टर गोव्यातून पळून गेला. नंतर तो थेट सोलापुरात गेला. पोलिसांनी डॉक्टराला तेथून अटक केली. हेल्थवे हॉस्पिटल व्यवस्थापनाने या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. आरोपी डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. रूग्णालयाने पीडितेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. परदेशी महिलेवर रूग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.