Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बसच्या तिकीटात हवाई प्रवास! फक्त १२९९ रुपयांमध्ये देशात कुठेही फिरा; 'या' कंपनीने आणली धमकेदार ऑफर

बसच्या तिकीटात हवाई प्रवास! फक्त १२९९ रुपयांमध्ये देशात कुठेही फिरा; 'या' कंपनीने आणली धमकेदार ऑफर
 

प्रत्येक मध्यमवर्गीयाने कधी ना कधी विमानाने प्रवास करायचं स्वप्न पाहिलं असेल. पण, हवाई प्रवासाच्या तिकीटाच किंमत आवाक्याबाहेर असल्याने अनेकांना ते सत्यात उतरवता येत नाही. मात्र, आता संधी चालून आली आहे. देशातील प्रमुख विमान कंपनी इंडिगोने 'ग्रँड रनवे फेस्ट' या नावाने एका धमाकेदार ऑफरची सुरुवात केली आहे. या ऑफरअंतर्गत, तुम्ही देशांतर्गत विमानप्रवास केवळ १,२९९ रुपयांच्या सुरुवातीच्या भाड्यात करू शकता, तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवासासाठी हे भाडे ४,५९९ रुपयांपासून सुरू होते. कंपनीने मर्यादित कालावधीसाठी ही खास सवलत जाहीर केली आहे, त्यामुळे तुम्ही सुट्टीचे किंवा व्यावसायिक प्रवासाचे नियोजन करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.

बुकिंग आणि प्रवासाच्या तारखांची अंतिम मुदत
 
इंडिगोच्या या ऑफर अंतर्गत तुम्ही १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत फ्लाइटची बुकिंग करू शकता. या तिकिटांवर तुम्ही ७ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या दरम्यान प्रवास करू शकता. ही ऑफर इंडिगोच्या goindigo.in या वेबसाइटवरून, मोबाइल ॲपवरून, इंडिगो 6ESkai किंवा इंडिगो व्हॉट्सॲप (+917065145858) च्या माध्यमातून केलेल्या बुकिंगवर उपलब्ध आहे.

देशांतर्गत इकोनॉमी क्लासचे भाडे: १,२९९ रुपयांपासून
आंतरराष्ट्रीय इकोनॉमी क्लासचे भाडे: ४,५९९ रुपयांपासून
देशांतर्गत बिझनेस/स्ट्रेच क्लासचे भाडे: ९,९९९ रुपयांपासून (निवडक मार्गांवर)
ब्लूचिप सदस्यांसाठी विशेष सवलत
इंडिगोने आपल्या ब्लूचिप सदस्यांना या ऑफरमध्ये अतिरिक्त सवलत दिली आहे. हे सदस्य प्रोमो कोड IBC10 वापरून इंडिगोच्या वेबसाइट किंवा ॲपवरून बुकिंग केल्यास तिकिटावर १०% पर्यंत अतिरिक्त सवलत मिळवू शकतात.

ब्लू ३ मेंबर: ५% सूट
ब्लू २ मेंबर: ८% सूट
ब्लू १ मेंबर: १०% सूट

या ऑफरमुळे ग्राहकांना कमी खर्चात प्रवासाची संधी मिळत आहे, त्यामुळे लवकर बुकिंग करून या संधीचा फायदा घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.