Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरच्या घरातून कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं

Breaking News! सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरच्या घरातून कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं
 

'स्पेशल 26' चित्रपटासारखा हुबेहुब प्रकार सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरात घडला. कवठेमहांकाळमध्ये डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काल (15 सप्टेंबर) रात्री तीन पुरुष व एका महिलेने आयकर अधिकारी असल्याचे सांगत धाड टाकली.

यावेळी चौघांनी ओळखपत्र दाखवत झडती घेण्याबाबत सर्च वॉरंट असल्याचे दाखवले. त्यानंतर घरात सर्वत्र शोधाशोध केली. यावेळी घरातील सर्व रोकड आणि सोने असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. संशयितांनी पलायन केल्यानंतर डॉ. म्हेत्रे यांनी या छाप्याबाबत चौकशी केली. त्यावेळी हा छापा बनावट असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांचा फौजफाटा सध्या घटनास्थळी दाखल झाला. या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरटे कोणत्या मार्गावर गेले याचा शोध देखील आता घेतला जात आहे. परंतु, स्पेशल 26 या सिनेमा सारखा प्रकार कवठेमहांकाळमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.