नक्षली इतिहासातील सर्वात मोठी शरणागती; 10 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपती कोण आहे?
गडचिरोली पोलीस आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपतीने त्याच्या तब्बल 50हुन अधिक सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
आता बंदुकीचा नक्षलवाद संपत आहे. शहरी नक्षलवाद हेच खरं चॅलेंज आहे. शहरी नक्षलवादी संविधान मानत नाहीत, पण त्यांना बाबासाहेबांचं संविधान हरवेल, अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करु असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच, गडचिरोली पोलीस आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले. कुठल्याही रक्तपाता शिवाय 61 माओवाद्यांनी शास्त्र खाली ठेवत पोलीसांपुढे आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला आहे. गडचिरोलीतील या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.
कोण आहे भूपती?
मल्लोजुला वेणुगोपाल हा भूपती किंवा सोनू या नावानेही ओळखला जातो. गेली 40 वर्षे नक्षलवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेला भूपती हा केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्यही होता. त्याच्यावर विविध राज्यांमध्ये मिळून 10 कोटींपेक्षाही अधिकचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. त्याचे बीकॉमपर्यंतचे शिक्षण झाले असून नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता अशी त्याची ओळख आहे. तो महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती.भूपतीने अभय नावाने आतापर्यंत अनेकदा पत्रके जारी केली आहेत. भूपतीने काही दिवसांपूर्वीच युद्धबंदी आणि चर्चा करण्यासह शस्त्रे टाकण्यासंबंधी महत्त्वाची विधाने केली होती. त्यावर नक्षलवाद्यांच्या नेतृत्वाने मोठी टीका केली होती. यामुळेच पहिल्यांदा माओवाद्यांच्या संघटनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. गडचिरोली पोलिसांकडून गेल्या अनेक दिवसांपासून भूपतीचे आत्मसमर्पण घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु होते. भूपती शरण येताच गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांत 700 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.