Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोपीचंद पडळकरांचा मोर्चा होताच जेलरला दणका ; पेट्रस गायकवाड यांची थेट नागपूरला बदली!

गोपीचंद पडळकरांचा मोर्चा होताच जेलरला दणका ; पेट्रस गायकवाड यांची थेट नागपूरला बदली!
 

आमदार गोपीचंद पडळकर, मिलींद एकबोटे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड हे कैद्यावर धर्मांतरासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर प्रकार कैद्यांनीच केलेल्या तक्रारीनंतर समोर आला होता. पडळकर यांनीही पेट्रस गायकवाड यांनी कारागृहातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीचा फोटो हटवून तिथे बायबलचे स्लोगन लिहण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांच्यावर केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गायकवाड यांच्यावर कारवाईसाठी पडळकर यांनी पत्रही लिहले होते. बीडमधील  हिंदू जनआक्रोश मोर्चा होवून चोवीस तास उलटत नाही तोच पेट्रस गायकवाड यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. त्यांची नागपूरला उपअधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. मी बीडमध्ये आता आलोय तर पेट्रस गायकवाड यांच्यावर कारवाई होणारच असा दावा पडळकर यांनी केला होता. अखेर बदली आदेश निघाल्याने तो खरा ठरला आहे.
 
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रीस गायकवाड यांच्यावर कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर  यांनी काही दिवसापुर्वी केला होता. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहले होते. आता हाच मुद्दा घेऊन पडळकर, एकबोटे यांनी बीडमध्ये येऊन हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला. मिलिंद एकबोटेंचा नेमका या मोर्चाशी काय संबंध? असा सवाल करत त्यांना काही संघटनांकडून विरोधही झाला.

गोपीचंद पडळकर यांनी या मोर्चात आक्रमक भाषण करत बीड कारागृहातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा लावलेला फोटो पेट्रीस गायकवाड यांनी काढल्याचा आरोप केला. तसेच त्याच ठिकाणी बायबलमधील नऊ संदेश लिहले. जे काम करायंच ते सोडून हा गायकवाड रिकामे उद्योग का करतोय? कैद्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यापर्यंत त्याचे धाडस कसे झाले? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होवून, पेट्रीस गायकवाड याला जोडे मारायला, बडतर्फ करायला मी इथे आलोयं, असं पडळकर यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगीतलं.
बीड जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक अशा दोन स्तरांवर तीव्र आंदोलनं सुरू आहेत. एकीकडे, कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामधून दादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी माघार घेतल्याने नवा वाद सुरू झाला आहे. हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांच्या पक्षावर यावरून जोरदार टीका केली आहे. हिंदूंच्या मतांवर निवडून येऊनही पक्षाने हिंदू हिताच्या भूमिकेसाठी पाठींबा देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचा आरोप एकबोटे यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महायुती सरकारने घेतलेला निर्णय ओबीसी आरक्षणाच्या मुळावर असल्याचा आरोप होत आहे. यासाठी ओबीसी नेत्यांनी न्यायालयासह रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून 17 रोजी बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा मेळावा होणार आहे. त्याआधीच बीडमधील राजकीय वातावरण पटेले आहे. गोपीचंद पडळकर, मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू जनआक्रोश मोर्चाने पुन्हा एकदा बीड चर्चेत आले आहे.
दरम्यान, भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्या मोर्चातील उपस्थितीवरून काही संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. ज्या व्यक्तींवर गुन्हेगारी आरोप आहेत, त्यांचे फोटो बॅनर्सवर न लावण्याच्या सरकारी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा मुद् उपस्थितीत करण्यात आला. सरपंच संतोष देशमुख यांची अमानूषपणे हत्या झाली, तेव्हा हिंदू जनआक्रोश मोर्चा का काढावा वाटला नाही? अशी टीकाही काही संघटनांनी केला.


भुजबळ, पडळकर येणार
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणारा ओबीसींचा बीडमधील मेळावा काही दिवसापूर्वी रद्द करण्यात आला होता. तो मोर्चा शुक्रवार, 17 रोजी बीडमध्ये होत आहे. या मोर्चाच्या आधीच पडळकर-एकबोटे यांनी काढलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाने बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसी मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ओबीसींनी मराठ्यांविरोधात मोर्चे काढू नये, अन्यथा आम्हीही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.