उत्तर प्रदेश: खाण्यासंदर्भातील वेगवेगळे चॅलेंजेस आपण वाचतो. सोशल मीडियाच्या जमान्यात असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. काही ठिकाणी या चॅलेंजसाठी मोठ्या रकमेची बक्षिसे दिली जातात. उत्तर प्रदेशमध्ये अंडी खाण्याच्या चॅलेंजमध्ये एका 42 वर्षीय माणसाने आपला जीव गमावला होता.
तेही फक्त किरकोळ रकमेसाठी. तुम्हाला वाचून धक्का बसला असेल पण ही घडलेली घटना आहे. सदर व्यक्तीचे नाव सुबोध यादव असे होते. तो उत्तर प्रदेशमधील जौंनपूर भागात राहात होता. माहितीनुसार सुबोध यादव जवळच्या बाजारात काही खाण्यासाठी गेले होते. तिथे एका व्यक्तीशी त्यांना वाद झाला आणि त्यांच्यात अंडी खाण्यावरून पैज लागली. या पैजेनुसार दोघांनी ठरवले की, जिंकणार्याला 2,000 रुपये दिले जातील मात्र यासाठी त्यांनी 50 अंडी खाल्ली पाहिजेत. सुबोधने हे चॅलेंज स्वीकारले आणि अंडी खायला सुरुवात केली. त्याने 41 अंडी खाल्ली.त्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. आजूबाजूला उपस्थित असणाऱ्यांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. जिल्हा रुग्णालयात त्याचा उपचार सुरू झाला, तिथून त्याला पुढील उपचारासाठी संजय गांधी इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले, पण काही तासांनंतर त्याने त्या ठिकाणी प्राण गमावले.संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांनी सांगितले की, सुबोध यादवचा मृत्यू अति खाण्यामुळे झाला. ही घटना २०१९ साली घडली होती. या प्रकारातून स्पष्ट झाले की खाण्याच्याबाबतीत कोणत्याही गोष्टीचे अतिरेक घातक ठरू शकतो. अहवालानुसार सुबोध यादव यांच्या मृत्यू प्रकरणाची ही घटना पूर्णपणे गैरजबाबदारीमुळे झाली. खाण्याचा हा अतिरेक टाळता आला असता तर सुबोध यांनी जीव गमावला नसता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.