Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुशखबर! दिवाळीपर्यंत आठव्या वेतन आयोगाची घोषणा? शिफारशी लवकरच लागू होणार

खुशखबर! दिवाळीपर्यंत आठव्या वेतन आयोगाची घोषणा? शिफारशी लवकरच लागू होणार
 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या दिवाळीला खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार यावेळी आठव्या वेतन आयोगाशी संबंधित मोठा निर्णय घेऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार चालू ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोग गठन होऊ शकतो. मागच्या अनेक दिवसांपासून यासंदर्भात नुसत्या चर्चा सुरु आहेत. वास्तविक आयोगाला अभ्यास करायला, शिफारशी स्वीकारायला आणि प्रत्यक्ष सरकारने निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो. मात्र यावेळी या सगळ्या प्रक्रिया पूर्वीपेक्षा गतीने होण्याची शक्यता आहे.

दिवाळीपर्यंत घोषणा होण्याची शक्यता

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यातच आठव्या वेतन आयोगाचे संकेत दिले होतं. परंतु आतापर्यंत याची अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की, याच दिवाळीपर्यंत आयोगाची स्थापना होऊ शकते. २०२६मध्ये सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपुष्टात येईल. निवडणुकीच्या वर्षाआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न सरकार करु शकतं.

शिफारशी कधीपर्यंत लागू होतील?
आठव्या वेतन आयोगाचं गठन नोव्हेंबर २०२५ मध्ये झालं तर पुढच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये म्हणजे २०२६ वर्षाच्या शेवटापर्यंत शिफारशी तयार होऊ शकतात. मागचे वेतन आयोग अभ्यासले तर सातवा वेतन आयोग तयार होऊन अडीच वर्षांनंतर लागू झाला. परंतु यावेळी शिफारशी लवकर याव्यात, ही सरकारची इच्छा आहे. त्याचं कारण २०२७ च्या सुरुवातीपर्यंत कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळू शकेल. 
 
मागच्या काही आयोगांचा अभ्यास केल्यास, वेतन आयोग पूर्णपणे लागू होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागू शकतात. सातवा वेतन आयोग फेब्रुवारी २०१४ मध्ये बनला होता. त्याचा अहवाल नोव्हेंबर २०१५ मध्ये आला आणि १ जानेवारी २०१६ पासून म्हणजे ३३ महिन्यांनंतर लागू झाला. याच पद्धतीने आठव्या वेतन आयोगाने काम केलं तर २०२७ उजाडेल. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार यावेळी हे काम वेगाने करु इच्छितं. आठ ते बारा महिन्यांच्या टाईमलाईनवर काम करण्याची सरकारची तयारी आहे. आयोगालादेखील तशा पद्धतीने सूचना देण्यात येऊ शकतात. याबाबत आता सरकारने राज्य, मत्रालयं आणि कर्मचारी संघटनांसोबत संवाद सुरु केला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.