ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी समस्या व रस्त्यातील खड्यांच्या प्रश्नांवरुन मनसेचा व ठाकरेंच्या शिवसेनेने आज ठाण्यात मोर्चा काढला. हा मोर्चा गडकरी रंगायतन ते थेट ठाणे महानगर पालिकेपर्यंत काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात दोन्ही
पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा
देण्यात आल्याय. मनसे नेते अविनाश जाधव, शिवसेना नेते राजन विचारे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड मोर्चात उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेच्या एका आजींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
महिलांनी शिंदेंच्या शिवसेना शाखेसमोर फोडली मडकी
यादरम्यान महिलांनी शिंदेंच्या शिवसेना शाखेसमोर मडके फोडत निषेध व्यक्त केला. दरम्यान मोर्चात सहभागी एका आजींशी झी 24 तासच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. "भाऊ एकत्र आलेत ते अख्ख्या महाराष्ट्रासाठी एकत्र आले आहेत. ते स्वार्थासाठी एकत्र आलेले नाहीत. आंदोलन केलं ते महापालिकेमधील भ्रष्टाचाराविरोधात आहे. यांनी बिल्डरांना विकत घेतलं आहे. यांची हुकूमशाही सुरु आहे. यांना आम्हाला लवकरात लवकर दरेगावला पाठवायचं आहे," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.पुढे त्यांनी म्हटलं की, "हुकूमशाही, अतिक्रमण सुरु आहे. घनकचऱ्यात जो भ्रष्टाचार सुरु आहे तो मोडून काढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. मेट्रोचा आमच्यासारख्या गरिबांना काही फायदा नाही. हा माणूस आता दरेगाव सोडून ठाण्यात आला आहे. याच्याकडे दोन हेलिकॉप्टर आहेत. आमच्या उद्धव ठाकरेंकडे साधारण 4 चारचाकी आहेत, बाकी काही नाही. मग याच्याकडे दोन हेलिकॉप्टर कुठून आले? एवढे 65 बंगले, एवढे प्लॅट, एवढी कार्यालयं कुठू आले?".
शिंदेंच्या शाखेसमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते
ठाणे
शहरातील वाढत्या नागरी समस्या आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या गंभीर
प्रश्नावर मनसे आणि ठाकरे गटाकडून आज ठाण्यात मोठा मोर्चा काढण्यात आला. या
मोर्चाला कळव्यातून जोरदार सुरुवात झाली आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते
शिंदेच्या कळवा मध्यवर्ती शाखेजवळ जमले. मोर्चादरम्यान
कार्यकर्त्यांनी ठाणे शहरातील खड्ड्यांची दुरवस्था दाखवण्यासाठी रस्त्यावर
प्रत्यक्ष पडून अपघातात जखमी झालेल्या तरुणांचे चित्रण केलं. या
माध्यमातून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर
कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शाखेसमोर मडके आणले होते. ठाण्यातील खड्डे,
पाणीटंचाई, टँकर माफिया आणि इतर नागरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी
घेतलेल्या या मोर्चाने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.