पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरु असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि 'आपला दवाखाना' प्रकल्पांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी केवळ २५ हजार रुपये मासिक मानधन असतानाही तब्बल २६५ एमबीबीएस उमेदवारांनी अर्ज केले असून, एरवी महापालिकेला डॉक्टर न मिळणाऱ्या महापालिकेला यावेळी मात्र डॉक्टरांचा मिळालेला प्रतिसाद पाहता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेने शहरातील प्राथमिक आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी एकूण १२५ आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि २५ 'आपला दवाखाना' सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या ५ परिमंडळांमधील ८६ केंद्रे कार्यरत आहेत, तर केवळ तीन जागेवर 'आपला दवाखाना' सुरु झाला आहे. या केंद्रांमध्ये योग, व्यायाम प्रशिक्षण, तसेच सामान्य औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे.
'आपला दवाखाना' प्रकल्पासाठी सुरवातीला राज्य सरकारकडून एका केंद्रासाठी दरमहा एक लाख रुपये भाडे देण्याचे ठरले होते. मात्र, आयुक्तांनी महापालिकेच्या जागाच वापरण्याचा आदेश दिला होता. नंतर जागा अपुरी पडल्याने पुन्हा भाडेतत्वावर जागा घेण्यास सुरवात झाली. सुरवातीला जिल्हा शल्यचिकित्सकांना या ३३ केंद्रांची जबाबदारी देण्यात आली होती, पण आता ती महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २२ पदांसाठी आलेल्या २६५ अर्जांपैकी उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत आणि सर्व प्रक्रिया जाहिरातीतील अटींनुसार पार पडत आहे. अशी माहिती आरोग्य प्रमुख, डॉ. निना बोराडे यांनी दिली.
या केंद्रांमध्ये कार्यरत राहण्यासाठी २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज केलेल्या २६५ उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया सध्या सुरू आहे. नियुक्तीसाठी जाहिरातींमध्ये स्पष्टपणे २५ हजार रुपये मासिक मानधन नमूद करण्यात आले आहे. कामगिरीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाल्यास अतिरिक्त १५ हजार रुपये प्रोत्साहनपर दिले जाणार आहेत. इतक्या कमी वेतनावर पात्र आणि तज्ज्ञ डॉक्टर या पदांसाठी अर्ज करत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.
परिमंडळ निहाय आरोग्यवर्धिनी केंद्रांची सद्यःस्थिती
परिमंडळ १ - २३परिमंडळ २ - ९परिमंडळ ३ - २६परिमंडळ ४ - २३परिमंडळ ५ - ५
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.