Big Breaking! सांगलीत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदाराचा पुत्र भाजपच्या वाटेवर, प्रवेशाची तारीखही ठरली
सांगली : पवारांच्या राष्ट्रवादीला सांगलीत एक मोठा धक्का बसला आहे. पुणे विभाग पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
मंगळवार, 7 ऑक्टोबर रोजी शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची भाजपमधील काही नेत्यांनी दिली. हा प्रवेश झाला तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असेल. अरुण लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असून ते माजी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांना धक्का देण्यासाठीच भाजपने अरुण लाड यांचा मुलगा शरद लाड यांना गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे. विजयादशमी निमित्ताने संभाजी भिडे यांच्या सांगलीतील दुर्गामाता दौडमध्ये शरद लाड यांनी उपस्थिती लावली होती. त्याचवेळी ते भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.