न्यायाचा बाजार! जामिनासाठी लाच अन् जप्त ड्रग्जची तस्करी; सातारा, पालघरचे न्यायाधीश बडतर्फ, एकजण कार्डेलियावर नशेत सापडलेला
लाच घेतल्याच्या आणि जप्त केलेल्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या आरोपांनंतर दोन सत्र न्यायाधीशांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय. सातारा आणि पालघर जिल्ह्यातील हे दोन सत्र न्यायाधीश आहेत. त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने दोन्ही न्यायाधीशांनी १ ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्यास सांगितलं. सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख असी बडतर्फ करण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत.
साताऱ्याचे जिल्हा न्यायाधीश संजय निकम यांनी जामीन देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने नकार दिला होता. त्यांनी निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं नव्हतं. उच्च न्यायालयाने शिस्तपालन समितीच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर बडतर्फीची कारवाई केली.पालघरचे जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय. इर्फान शेख यांच्यावरही धनंजय निकम यांच्याप्रमाणेच आरोप होते. त्यांचीही शिस्तपालन समितीने चौकशी केली होती. मुंबईत बॅलॉर्ड पिअर न्यायालयात ते दंडाधिकारी होते. त्यावेळी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे सुनावणीला येत असतं. तेव्हा कारवाईत जप्त केलेल्या आणि मुद्देमाल म्हणून न्यायालयात जे अंमली पदार्थ सादर केले जात त्यातून अंमली पदार्थांची ते तस्करी करत होते असा आरोप होता.शेख यांच्याबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आलीय. ते कार्डेलिया क्रूझवर गाजलेल्या पार्टीला उपस्थित होते. तेव्हा ते नशेत सापडले होते. मात्र क्रूझवर छापा टाकलेल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना तिथून बाहेर काढले होते असा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आलीय. या प्रकरणात भ्रष्ट्राचाराचा आरोप करत शेख यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. अद्याप या याचिकेवर सुनावणी झालेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.