शेतकऱ्याचे आणि त्याचे वारसाचे नाव गाव नमुना सातमध्ये नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश होते. मात्र, हे आदेश असताना देखील तहसीलदार आणि नायब तहसीलदाराने हे प्रकरण निकाली न काढता मालकी हक्काबाबत वाद आहे, असा ठपका ठेवल्याने न्यायालय आणि वन विभागाने मोठे पावले उचलत नागपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचे निलंबन करण्याचे निर्देश दिले.महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी तत्काळ भांडारकर आणि खांडरे यांचे निलंबन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी परमेश्वर मेश्राम यांचे नाव नोंदवण्याचे आदेश असताना देखील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी कारवाई केली नाही. त्यामुळे निराश झालेल्या मेश्राम यांनी तहसील कार्यालयात विष प्रशासन आत्महत्या करण्याचा प्रयत्न 26 सप्टेंबरला केला. सुदैवाने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्या जीवाचा धोका टळला.न्यायलयाच्या आदेशाची अंमलबजवाणी होत नसल्याची दखल न्यायालयाने घेत तत्काळ महसूल अधिनियम १९६६ आणि नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका भांडाकर, खांडरे या अधिकाऱ्यांवर ठेवत कारवाई निर्देश देत तत्काळ निलंबित करण्यास सांगितले. मेश्राम यांनी विष प्राशन केल्याने जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी देखील तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
मुख्यालय सोडता येणार नाही...
अवर
सचिव प्रवीण पाटील यांनी केलेल्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की,
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भांडरकर आणि खांडरे यांना
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच
निलंबनाच्या कालवधीत खासगी नोकरी, व्यवसाय करता येणार नाही केल्यास निलंबन
भत्ता रद्द करण्यात येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.