Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फुलचंद पान! चव की जहर? तरुणांच्या आरोग्याला मोठा धोका..वाचा सविस्तर माहिती

फुलचंद पान! चव की जहर? तरुणांच्या आरोग्याला मोठा धोका..वाचा सविस्तर माहिती
 

सध्या फुलचंद नावाच्या मसालेदार पान सेवन करण्याचे प्रमाण राहू (दौंड) भेट परिसरातील तरुणांमध्ये वाढले आहे. कधी तरी खाल्‍ले तर ते अन्न पचायला मदत करते. परंतु रोजच खाणे म्हणजे त्याचे व्यसन लागणे धोक्याचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बेट परिसरात ही पाने मिळण्याची ठिकाणे वाढल्यामुळे सहज उपलब्ध होणारे फुलचंद पान तरुणांसाठी खूप मोठा धोका निर्माण तर निर्माण करत नाही ना.सुपारी आणि चुना याच्या जोडीला सुगंधित पदार्थ तसेच मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थ मिसळून तयार केलेले हे पान आता केवळ चवीसाठी नव्हे तर नशेसाठी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे.

विशेषतः शाळा आणि महाविद्यालय परिसरात याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरुवातीला फक्त चवीसाठी स्टाईल मारण्यासाठी सुरू केलेले हे व्यसन आता तरुणांंच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक बनत आहे. हे पान म्हणजे शरीरात विष जात असल्याचा गंभीर इशारा डॉक्टरांनी दिला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सहज उपलब्ध असलेले आहे रासायनिक घटक मिसळून विकले जाणार हे पान आता ग्रामीण भागात सहज मिळत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी अगदी अल्पवयीन मुले देखील या पानाच्या आहारी जात आहेत. सुरुवातीला फक्त चवीसाठी म्हणून सुरू झालेले सेवनाने आता व्यसनाच्या राक्षसाचे रुप घेत आहे. त्याचे सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणाम गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. रासायनिक पदार्थामुळे हृदयविकारात धोका वाढणे व मानसिक अस्वस्थता, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या लक्षणांमुळे तरुणांचे व अल्पवयीन मुलांचे वैयक्तिक आयुष्य धोक्यात येत आहे. या मुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे महत्वाचे लक्षण आहे.या मुळे तरुणांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत आहे. त्या मुळे या कडे सरकारने व समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे.

शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात जास्त खप..
सर्वात दुर्दैवाची गोष्टी ही आहे की इतर ठिकाणी या पानाला मागणी आहेच,परंतु शाळा महाविद्यालयाच्या ठिकाणी याचा खप मोठ्या प्रमाणात आहे. कारण शाळेतील आठवी ते दहावी व महाविद्यालयातील तरुण मोठ्या प्रमाणात या पानाचे सेवन करत आहेत.
३० रुपयांत नशा..
 
या एका पानामुळे ३० रुपयांमध्ये पूर्ण एका बाटलीची नशा येत असल्याचे हे पाण खाणाऱ्यांनी सांगितले. ब्रँडेड दारूचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याला पर्याय म्हणून अनेक जण हे पान खातात. परंतु या मुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे या पानाची बेट परिसरात अनेक गावात अनेक टपरी वजा दुकानात सहज उपलब्धत होत आहे, हे विशेष आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे खाण्याचे प्रमाण वाढत आहे.

निद्रिस्त पोलीस प्रशासन..
बेट परिसराच नाही तर दौंड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ही पाने उपलब्ध आहेत. अनेक नागरिकांनी या बाबत आवाज उठविला आहे. तसेच अनेक वेळा वर्तमान पत्रांतून याची वाच्यता झालेली आहे.परंतु पोलिस प्रशासनाकडून याची अजिबात दखल घेतली जात नाही हे विशेष.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.