कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्यासोबत गैरवर्तन, संतापजनक व्हिडीओ व्हायरल, थेट बिग बी यांना.
कौन बनेगा करोडपती शोच्या माध्यमातून बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. अर्ध्यापेक्षा जास्त लोक हा शो फक्त अमिताभ बच्चन यांच्यामुळे बघतात. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन देखील कौन बनेगा करोडपतीसोबत भावनिक जोडले असून त्यांच्या पडद्याकाळात याच शोने त्यांना साथ दिली.
विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांना भेटण्याची एक थेट संधी मिळते. अमिताभ बच्चन यांच्यापुढे हॉट सीटवर बसण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. अमिताभ बच्चन यांना मोठा सन्मान या शोमध्ये दिला जातो. मात्र, आता एक अत्यंत वाईट असा अनुभव अमिताभ बच्चन यांना शोमध्ये आला. कौन बनेगा करोडपतीच्या शोमधील लेटेस्ट एपिसोडचा व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत. याठिकाणी अमिताभ बच्चन हे असल्याने परिस्थिती त्यांनी सांभाळून घेतली, त्यांच्याऐवजी दुसरे कोणी असते तर स्थिती वाईट असती, असे थेट प्रेक्षकांनी म्हटले. एका मुलाने थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत चुकीचे वर्तन केले. मात्र, अमिताभ बच्चन यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेम पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
कौन बनेगा करोडपती 17 च्या एपिसोडमध्ये गुजरातमधील मयंक हा हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यापुढे बसला. तो तिथे बसल्यानंतर उत्साही दिसला. अमिताभ बच्चन यांनी मयंकला विचारले की, तुला कसे वाटते आहे? त्याने म्हटले, मी खूप जास्त एक्साइटेड आहे. पण आपण सरळ मुद्द्यावर येऊ. यादरम्यान त्याचे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन यांनी चेहऱ्यावर स्माईल दिली. त्यानंतर पहिल्याच प्रश्नापासून ते पाचव्या प्रश्नापर्यंत तो गडबड करत होता.
हेच नाही तर अमिताभ बच्चन यांना पुर्ण प्रश्नही वाचू देत नव्हता. प्रश्नाचे पर्याय देण्याच्या अगोदरच तो उत्तर सांगत होता आणि पर्याय देऊ नका… तुम्ही फक्त उत्तर लॉक करा असे बोलताना तो परत परत दिला. त्याने अमिताभ बच्चन यांना बऱ्याचदा बोलू दिले देखील नाही. शेवटी पाचवा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी त्याला विचारला.. त्यावेळी प्रश्न पूर्ण विचारण्याच्या अगोदरच तो पर्याय द्या लवकर म्हणाला. पर्याय दिल्यानंतर त्याने चुकीचा प्रश्न निवडला.अमिताभ बच्चन पुढे काही बोलण्याच्या अगोदरच त्याने थेट म्हटले की, तिसरा पर्याय लॉक करा… एकदा नाही तर मी सांगतो ना…तीन वेळा करा… मात्र, त्याचे हे उत्तर चुकीचे आहे. यादरम्यान तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत चुकीचे वर्तन करत असतानाही अमिताभ बच्चन यांनी संयम सोडला नाही. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर लोक मोठ्या संख्येने टीका करताना दिसत असून मुलाला चांगले शिक्षण देण्यासोबतच संस्कार देणे आवश्यक असल्याचे म्हणताना दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.